Misal Pav Recipe: रविवारी नाश्त्यासाठी घरच्या घरी बनवा झणझणीत पुणेरी मिसळ, वाचा रेसिपी

Shruti Vilas Kadam

मिसळसाठी साहित्य तयार करा

मटकीची उसळ, कांदा, टोमॅटो, आलं-लसूण पेस्ट, हिरवी मिरची, मोहरी, जिरे, हळद, लाल तिखट, गरम मसाला, मीठ आणि तेल घ्या.

misal pav recipe

मटकीची उसळ बनवा

मोड आलेली मटकी स्वच्छ धुवून घ्या. कढईत तेल गरम करून मोहरी, जिरे, हिरवी मिरची आणि कांदा परतून घ्या. त्यात मसाले आणि मटकी घालून शिजवा.

misal pav recipe

मिसळीचा कट तयार करा

कढईत तेल गरम करून कांदा, टोमॅटो आणि आलं-लसूण पेस्ट परता. त्यात लाल तिखट, हळद, गरम मसाला आणि आवश्यकतेनुसार पाणी घालून उकळी आणा.

Misal Pav Recipe

उसळ आणि कट एकत्र करा

तयार केलेली मटकीची उसळ कटमध्ये घाला. सर्व साहित्य व्यवस्थित मिसळून काही मिनिटे उकळू द्या. यामुळे मिसळीला मसालेदार चव येते.

Misal Pav Recipe | Yandex

तिखटपणा आवडीनुसार ठेवा

मिसळ अधिक झणझणीत हवी असल्यास लाल तिखट किंवा तिखट कटचे प्रमाण वाढवू शकता. चवीनुसार मसाल्यांचे प्रमाण कमी-जास्त करा.

Misal Pav Recipe

मिसळीची सजावट करा

सर्व्ह करताना वाटीत गरम मिसळ घ्या. त्यावर बारीक चिरलेला कांदा, कोथिंबीर, फरसाण आणि शेव घाला. वरून लिंबाचा रस पिळा.

Misal Pav Recipe | Yandex

पावसोबत गरमागरम सर्व्ह करा

मिसळ पावसोबत ताजा पाव, लिंबाची फोड आणि कांदा सर्व्ह करा. घरी बनवलेली झणझणीत मिसळ नाश्त्यासाठी किंवा संध्याकाळच्या स्नॅक्ससाठी उत्तम आहे.

Misal Pav Recipe | Google

Toenails Turn Black: पायांची नखं अचानक काळी-पिवळी पडतायत? जाणून घ्या यामागची ३ प्रमुख कारणे

Toenails Turn Black and Yellow | Saam Tv
येथे क्लिक करा