Mumbai Parel-Chinchpokli Procession Clash And Police Intervention Saam Tv
Video

Mumbai : मिरवणुकीदरम्यान दोन गटात हाणामारी, मुंबईतल्या परळमध्ये तणाव

Mumbai Parel News : मुंबईतील परळ-चिंचपोकळी परिसरात मिरवणुकीदरम्यान दोन गटांमध्ये धक्काबुक्की आणि बाचाबाची झाल्याची घटना. काही ठिकाणी दगडफेकीची माहिती असून पोलिसांनी हस्तक्षेप करून परिस्थिती नियंत्रणात आणली.

Alisha Khedekar

मुंबईतील परळ-चिंचपोकळी परिसरात एका मिरवणुकीदरम्यान दोन गटांमध्ये धक्काबुक्की आणि बाचाबाची झाल्याची घटना समोर आली आहे. या घटनेनंतर काही ठिकाणी दगडफेक झाल्याचीही माहिती मिळत आहे. घोषणाबाजी तसेच काही पोस्टर्स फाडल्याच्या प्रकारामुळे परिसरात अचानक तणावाचे वातावरण निर्माण झाले. घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी तातडीने घटनास्थळी धाव घेत परिस्थितीचा आढावा घेतला. पोलिसांच्या हस्तक्षेपानंतर परिस्थिती नियंत्रणात आणण्यात आली असून, सध्या परिसरात शांतता आहे. कोणताही अनुचित प्रकार घडू नये यासाठी पोलिसांकडून खबरदारी घेतली जात आहे. दरम्यान, या घटनेबाबत सोशल मीडियावर विविध प्रकारच्या चर्चा आणि अफवा पसरू शकतात. त्यामुळे नागरिकांनी कोणत्याही अपुष्ट माहितीवर विश्वास ठेवू नये, तसेच अफवा पसरवू नयेत, असे आवाहन पोलिसांनी केले आहे. परिस्थितीवर पोलिसांचे बारकाईने लक्ष असून नागरिकांनी शांतता आणि संयम राखण्याचे आवाहनही करण्यात आले आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Manoj Jarange: लाठीचार्ज झाला तर सरकार पडेल, मुंबईतील आंदोलनाबाबत मनोज जरांगेंची मोठी घोषणा

Thursday Horoscope: करिअरमध्ये प्रगती अन् अचानक धनलाभ; या ६ राशींना मिळणार आनंदाची बातमी, वाचा गुरुवारचं राशीभविष्य

Gauri Visarjan Date: गौरीचे विसर्जन कोणत्या दिवशी करायचं? जाणून घ्या संपूर्ण माहिती

Maharashtra News Live Update: मी मुंबईला जाणार - मनोज जरांगे

Cricket Ranking : टी २० रँकिंगमध्ये मोठी उलथापालथ; भारताचा धाकड फलंदाज पहिल्या क्रमांकावर, बुमराहचीही मोठी झेप

SCROLL FOR NEXT