Manasvi Choudhary
आपण एखाद्या ठिकाणी फिरण्यासाठी किंवा कामानिमित्त गेल्यानंतर हॉटेल बुक करतो. पंरतु, हॉटेलमध्ये चेक- इन केल्यानंतर तुम्ही काही महत्वाच्या गोष्टी तपासणे महत्वाचे आहे.
हॉटेलच्या रूममध्ये प्रवेश केल्यानंतर दरवाजाचे लॉक, सेफ्टी लॅच आणि खिडक्यांचे लॉक व्यवस्थित लागतात की नाही हे तपासा.
हॉटेलच्या रूममध्ये छुपे कॅमेरे असतात. रूममधील लाईट्स पूर्णपणे बंद करा आणि मोबाईलच्या टॉर्चचा प्रकाशाने कुठे कॅमेरा आहे का ते तपासा.
बेडवरील चादर , उशीचे कव्हर आणि ब्लँकेट स्वच्छ आहेत की नाही हे तपासा. चादरीवर डाग, केस किंवा ढेकूण नाहीत ना, हे चेक करा.
वॉशरूममध्ये नळ, शॉवर आणि फ्लश व्यवस्थित सुरू आहे की नाही. पाण्याला नीट फ्लो आहे की नाही ते चेक करा.
रूममधील एसी, टीव्ही, रिमोट, पंखा आणि सर्व चार्जिंग सॉकेट्स व्यवस्थित चालू स्थितीत आहेत का हे तपासा.