CPR During Heart Attack: हार्ट अटॅक आला की सीपीआर कधी द्यायचा? जीव वाचवण्यासाठी योग्य मार्ग लक्षात ठेवा

Manasvi Choudhary

हार्ट अटॅक

अचानक हार्ट अटॅक आल्यास योग्य वेळी उपाययोजना केल्यास एखाद्याचा जीव वाचू शकतो.

Heart Attack | PINTEREST

CPR

कार्डिओपल्मोनरी रिससिटेशन म्हणजेच CPR ही एक अत्यंत महत्त्वाची आपत्कालीन प्रक्रिया आहे. जेव्हा हृदय प्रभावीपणे रक्त पंप करू शकत नाही, तेव्हा ही प्रक्रिया तुम्ही करू शकता. CPR दिल्याने मेंदू आणि शरीराच्या इतर महत्त्वाच्या अवयवांना रक्तपुरवठा चालू ठेवण्यास मदत करते.

CPR During Heart Attack

CPR केव्हा द्यावा?

परंतु, CPR केव्हा द्यावा आणि तो योग्य रीतीने कसा द्यावा? हे या वेबस्टोरीतून जाणून घ्या.

CPR During Heart Attack

CPR कधी सुरू करावा?

वैद्यकीय सल्ल्यानुसार, जेव्हा एखाद्या व्यक्तीला श्वास घ्यायला तीव्र त्रास होत असेल, तेव्हा ताबडतोब CPR सुरू करावा.

When to Perform CPR

CPR कधी देऊ नये

कधीकधी व्यक्तीचा श्वास चालू असतो किंवा व्यक्ती धापा टाकत असते, पण तरीही श्वास घेण्यात अडचण येत असते; अशा वेळी तात्काळ डॉक्टरांशी संपर्क साधावा.

Heart Attack | PINTEREST

वेद्यकीय मदत महत्वाची

वैद्यकीय मदत येईपर्यंत CPR प्रक्रिया थांबवू नका, जेणेकरून उपचारात उशीर होणार नाही याची काळजी घ्यावी.

Heart attack | pinterest

CPR देण्याची योग्य पद्धत

एखाद्या व्यक्तीला CPR देताना, प्रथम तिला सपाट पृष्ठभागावर झोपवा.

तुमच्या एका हाताच्या तळहाताचा खालचा भाग छातीच्या मध्यभागी ठेवा आणि दुसरा हात त्याच्यावर ठेवून बोटे लॉक करा.

CPR

कोपर सरळ ठेवून, छातीवर घट्ट आणि वेगाने दाब द्या.

१०० ते १२० वेळा छातीवर दाब देण्याचा प्रयत्न करा.

प्रत्येक दाब दिल्यानंतर छातीला पुन्हा पूर्ववत स्थितीत येऊ द्या. जर तोंडाने श्वास देता येत असेल तर तो योग्य प्रकारे द्यावा.

CPR

CPR केव्हा देऊ नये?

जर एखादी व्यक्ती पूर्णपणे शुद्धीवर असेल, प्रतिसाद देत असेल आणि सामान्यपणे श्वास घेत असेल, तर CPR देण्याची कोणतीही आवश्यकता नसते.

When NOT to Give CPR

श्वास आणि नाडी सुरळीत चालू आहे की नाही चेक करा

जर एखादी व्यक्ती बेशुद्ध असेल, पण तिचा श्वास आणि नाडी सुरळीत चालू असेल, तर छातीवर दाब देऊ नका; अशा वेळी त्वरित योग्य तो वैद्यकीय सल्ला घ्या.

Heart Attack

next: Soaked Walnut Vs Dry Walnuts: भिजवलेले की सुके, मेंदूच्या आरोग्यासाठी कोणते अक्रोड बेस्ट?

Soaked Walnut Vs Dry Walnuts
येथे क्लिक करा..