Scorching heat grips Vidarbha as temperatures soar above 46°C, prompting an orange alert in multiple districts. saam tv
Video

विदर्भ भाजतोय! 46°C पार तापमान; 'या' चार जिल्ह्यांना ऑरेंज अलर्ट

Vidarbha Heatwave Orange Alert Latest News: विदर्भात उष्णतेची लाट अधिक तीव्र झाली असून नागपूर वेधशाळेकडून अकोला, अमरावती, वर्धा आणि यवतमाळ जिल्ह्यांसाठी ऑरेंज अलर्ट जारी करण्यात आला आहे.

Omkar Sonawane

नागपूर: विदर्भात उष्णतेची लाट आणखी तीव्र होण्याची शक्यता व्यक्त करण्यात आली आहे. नागपूर वेधशाळेतून अकोला, अमरावती, यवतमाळ आणि वर्धा या जिल्ह्यांसाठी ऑरेंज अलर्ट जारी करण्यात आला आहे. या पार्श्वभूमीवर प्रशासनाने नागरिकांना दुपारच्या वेळेत अत्यावश्यक कामांशिवाय बाहेर पडणे टाळावे, असा इशारा दिला आहे. विशेषतः लहान मुळे, ज्येष्ठ नागरिक आणि आजारग्रस्तांनी अधिक काळजी घेण्याचे आवाहन करण्यात आले आहे. आज विदर्भातील बहुतांश जिल्हयांमध्ये तापमान 45 ते 46 अंश सेल्सिअसच्या पुढे जाण्याची शक्यता हवामान धोका वाढला असून नागरिकांनी पुरेसे पाणी पिणे, डोक्यांवर संरक्षण ठेवणे आणि उन्हात जास्त वेळ न राहणे अशा सूचना देण्यात आल्या आहेत.

दरम्यान, काल विदर्भात विक्रमी तपमानाची नोंद झाली. वर्धा येथे सर्वाधिक 46.5 अंश सेल्सिअस तापमान नोंदवले गेले. त्यापाठोपाठ अमरावती 46.4, अकोला 46.3, यवतमाळ 45.4 आणि नागपूर 44.4 अंश सेल्सिअस तापमानाची नोंद झाली. उष्णतेची ही लाट पुढील काही दिवस कायम राहण्याची शक्यता असल्याने नागरिकांनी आवश्यक ती खबरदारी घ्यावी असे आवाहन प्रशासनाने केले आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Ben Stokes : भारत-इंग्लंडच्या सामन्यांआधी मोठी बातमी! दिग्गज क्रिकेटपटूची तडकाफडकी रिटायरमेंट, क्रिडाविश्वात खळबळ

Maharashtra News Live Update: बालबेडा जंगलात माओवाद्यांचा शस्त्रनिर्मिती कारखाना उद्ध्वस्त; पोलीस-सीआरपीएफची मोठी कारवाई

१,४०० किलोमीटर लांबी, ८ लेन; महाराष्ट्रासह पाच राज्यांना जोडणार द्रुतगती मार्ग, जाणून घ्या महामार्गाचे वैशिष्ट्ये

कितीही खासदार फोडा, उरावर भगवा फडकवणार, ओमराजेंच्या मतदारसंघात ठाकरेंची तोफ धडाडली

Spring Roll Recipe: घरच्या घरी बनवा टेस्टी स्प्रिंग रोल; वाचा सोपी रेसिपी

SCROLL FOR NEXT