Vegetables SAAM TV
Video

Vegetables Price Hike : भाजीपाल्याला महागाईची फोडणी, गवार- मटार २०० रुपयांवर; सर्वसामान्यांचे हाल | VIDEO

Vegetables Have Become Expensive : राज्यात झालेल्या अतिवृष्टीमुळे भाजीपाल्याला महागाईची चांगलीच झळ बसली आहे. परतीच्या पावसामुळे शेतमालाचं नुकसान झाल्याने बाजारात आवक घटली आहे.

ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई

राज्यात झालेल्या अतिवृष्टी आणि परतीच्या पावसामुळे भाजीपाला बाजारात भाजीपाल्याला महागाईची चांगलीच झळ बसली आहे. शेतमालाचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाल्याने बाजारात आवक घटली आहे. त्यामुळे मटार आणि गवार यांचे भाव तब्बल २०० रुपयांवर पोहचले आहेत. दसऱ्याच्या दिवशी मुंबईत भाजीपाला मागणीपेक्षा तब्बल 1 हजार टनांनी कमी होता, त्यामुळे भावात झपाट्याने वाढ झाली . फक्त गवार आणि मटारच नव्हे तर इतर भाज्यांनीही शंभरी गाठली आहे. वांगी, भेंडी, पालक, कोथिंबीर यांच्याही भावात लक्षणीय वाढ दिसत आहे. सणासुदीच्या काळात वाढलेले भाजीपाल्याचे दर सर्वसामान्य ग्राहकांच्या खिशाला चांगलाच फटका देत आहे.

भाजीपाल्यांचे वाढलेले दर : -

गवार

घाऊक ६० - ९०

किरकोळ १८० - २००

मटार

घाऊक १०० - १४०

किरकोळ २०० - २२०

भेंडी

घाऊक ३६ - ५०

किरकोळ १०० - १२०

वांगी

घाऊक ३४ - ४०

किरकोळ ८० - १००

शेवगा शेंगा

घाऊक ६० - ९०

किरकोळ १०० - १६०

पालक

घाऊक १५ - १६

किरकोळ ५० - ६०

मेथी

घाऊक १८ - २०

किरकोळ ४० - ५०

कोथिंबीर

घाऊक ८ - १२

किरकोळ ३५ - ४०

शेपू

घाऊक १० - १२

किरकोळ ४०

कांदापात

घाऊक १४ - १५

किरकोळ ३०

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra Live News Update: ७१ व्या सवाई गंधर्व भीमसेन महोत्सवाच्या तारखा जाहीर

Instagram: तुम्ही जे बोलता किंवा विचार करता तेच इन्स्टाग्रामवर दिसतं? कारण काय? वाचा सविस्तर

Sanjay Raut Vs Ramdas kadam: रामदास कदमांच्या तोंडात कुणीतरी शेण कोंबलं'; संजय राऊतांचं संतप्त प्रत्युत्तर

Snake Bite : नुकसानीचे पंचनामे करताना तलाठ्याला सर्पदंश; उपचारासाठी रुग्णालयात दाखल

Pakistan: पाकिस्तानला पुन्हा हादरा! पेशावरमध्ये बॉम्बस्फोट, ९ जणांचा मृत्यू

SCROLL FOR NEXT