Vasant More Shivsena News Saam TV
Video

Vasant More : तब्बल १०० गाड्यांचा ताफा, हातात भगवे झेंडे; वसंत मोरेंची कार्यकर्त्यांसह मुंबईकडे कूच, पाहा VIDEO

Vasant More Shivsena News : तब्बल १०० गाड्यांचा ताफा, हातात भगवे झेंडे घेऊन घोषणाबाजी करत वसंत मोरे मुंबईकडे निघाले असल्याचा व्हिडीओ समोर आला आहे.

Satish Daud

अक्षय बडवे, साम टीव्ही पुणे

पुणे महानगरपालिकेचे माजी नगरसेवक वसंत मोरे हे आज शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे यांच्या पक्षात प्रवेश करणार आहेत. यासाठी शेकडो कार्यकर्त्यांसह मोरे हे पुण्याहून मुंबईच्या दिशेने रवाना झाले आहेत. तब्बल १०० गाड्यांचा ताफा, हातात भगवे झेंडे घेऊन घोषणाबाजी करत वसंत मोरे मुंबईकडे निघाले असल्याचा व्हिडीओ समोर आला आहे.

आधी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेमध्ये असलेल्या वसंत मोरे यांनी लोकसभेची निवडणूक वंचितकडून लढवली होती. त्यानंतर मागील आठवड्यात त्यांनी मुंबईतील मातोश्री निवासस्थानी जाऊन उद्धव ठाकरे यांची भेट घेतली होती.

लवकरच मी शिवसेनेत जाहीर प्रवेश करणार असं वसंत मोरे यांनी माध्यमांना सांगितलं होतं. आज वसंत मोरे हे आपल्या शेकडो कार्यकर्त्यांसह हातात भगवे झेंडे घेऊन मुंबईच्या दिशेने रवाना झाले आहे. मुंबई-पुणे एक्स्प्रेस वेवरील वसंत मोरे यांच्या ताफ्याचा व्हिडीओ समोर आला आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Matka Water: उन्हाळ्यात माठातलं पाणी पिताय? चुकीच्या पद्धतीमुळे पडाल आजारी, लक्षात ठेवा ही १ गोष्ट

Maharashtra Live News Update: नांदेडमधील अनिल पंजाबी उर्फ सदा गँगच्या चार आरोपींना अटक

Pune News: पुण्यात खळबळ! नामांकित शिक्षण संस्थेत विद्यार्थ्याचा मृत्यू, बास्केटबॉलचा स्टँड अंगावर कोसळला

Gold Rate: सोन्याच्या दरात 3,666 रुपयांनी वाढ; खरेदीपूर्वी जाणून घ्या आजचे ताजे दर

सत्ताधारी पक्षाचा नेता शेतात तरुणीसोबत नको त्या अवस्थेत सापडला; मुलगी चप्पल घेऊन पळाली, Video व्हायरल

SCROLL FOR NEXT