Prakash Ambedkar SaamTV
Video

VBA News : वंचित बहुजन आघाडीचा जाहीरनामा प्रसिद्ध! पाहा नेमकं काय आहे जाहीरनाम्यात | Video

Prakash Ambedkar News : विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर आज वंचित बहुजन आघाडीकडून मतदारांसाठी जाहीरनामा प्रकाशित करण्यात आला आहे.

Saam Tv

वंचित बहुजन आघाडीचा जाहीरनामा लवकरच प्रकाशित होणार असून त्या जाहिरनाम्याची प्रत साम टीव्हीच्या हाती आली आहे. विधानसभा निवडणुकीच्या अनुषंगाने सर्व पक्ष तयारीला लागले आहे. सगळ्यांकडून जाहिरनामे समोर येत असताना आता वंचित बहुजन आघाडीचा जाहीरनामा देखील लवकरच जनतेसमोर येणार असला तरी त्या आधीच आज या जाहिरनाम्याची प्रत साम टीव्हीच्या हाती आली आहे. या जाहीरनाम्यात वंचित बहुजन आघाडीकडून आरक्षणाच्या मुद्द्यावर सुरक्षितता देण्यात येणार असल्याचं म्हंटलं आहे. तर सरकार आल्यास महिलांना ३५०० रुपयांच मासिक वेतन देण्यात येईल, त्याचबरोबर शेतमाल हमीभाव कायदा करणार असल्याचं देखील वंचितने आपल्या जाहिरनाम्यात म्हंटलं आहे.

वंचित बहुजन आघाडीचे राष्ट्रीय अध्यक्ष बाळासाहेब आंबेडकर यांच्या हस्ते महाराष्ट्र विधानसभा 2024 जाहीरनामा जोशाबा समतापत्रचे प्रकाशन करण्यात आले आहे. या जाहीरनाम्यात आरक्षणाबाबत सुरक्षितता देण्यात येईल, भटक्या विमुक्त समुदाय या संदर्भात धोरण आखलं जाईल, महिलांना साडेतीन हजार रुपये मासिक वेतन आणि वर्षाला ३ गॅस सिलेंडर देण्यात येतील, केजी टु पिजी शिक्षण फ्री करणार, बेरोजगार तरुण तरुणींना २ वर्ष ५ हजार भत्ता देणार अशा अनेक गोष्टींची तरतूद जाहीरनाम्यात केली आहे.

Edited By Rakhi Rajput

सकाळ+चे सदस्य व्हा

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra Politics : महायुतीच्या सत्ता स्थापनेचा निर्णय लांबणार? मंत्रिमंडळाचा फॉर्म्युला काय ठरला? पाहा व्हिडिओ

Ekanth Shinde : एकनाथ शिंदे यांची गटनेतेपदी निवड; पक्षाच्या बैठकीत एकमताने ठराव मंजूर

Maharashtra Politics: निवडणुकीतील यशाने ब्रँडवर शिक्कामोर्तब! ठाकरे, पवारांनंतर आता शिंदेशाही

Maharashtra Politics: घड्याळाची तुतारीवर मात! दादांची राष्ट्रवादी पवारांवर वरचढ

Pune Politics : पुण्यात काँग्रेसचा सुपडासाफ; जिल्ह्याची सुभेदारी महायुतीकडे का गेली? वाचा स्पेशल रिपोर्ट

SCROLL FOR NEXT