Sandeep Tandale seen abusing and threatening MLAs in viral video linked to jailed gangster Valmik Karad Saam Tv
Video

Beed Crime: वाल्मीक कराड जेलमध्ये... तरी गँग अ‍ॅक्टिव्ह! सहकाऱ्याचा व्हिडिओ व्हायरल, आमदारांना धमक्या आणि शिवीगाळ|VIDEO

Valmik Karad Gang: जेलमध्ये असलेला वाल्मीक कराडचा सहकारी संदीप तांदळे याने आमदारांना धमकावत शिवीगाळ करतानाचा व्हिडिओ व्हायरल केला आहे.

Omkar Sonawane

बीड: येथील संतोष देशमुख हत्येप्रकरणात तुरुंगात असलेला मुख्य आरोपी आणि कुख्यात गुंड वाल्मीक कराड सध्या जेलमध्ये असला तरी त्याच्या गुन्हेगारी गँगचे दहशत मात्र सुरूच असल्याचं समोर आलं आहे. कराडचा जवळचा सहकारी संदीप तांदळे याने नुकताच एक व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल करत खळबळ उडवून दिली आहे.

या व्हिडिओमध्ये तांदळेने राष्ट्रवादीचे आमदार जितेंद्र आव्हाड, बीडचे आमदार सुरेश धस आणि बाळा बांगर यांच्याविरोधात अश्लील भाषेत शिवीगाळ केली असून धमकीवजा वक्तव्य केल्याचं स्पष्टपणे दिसत आहे.

तांदळे व्हिडिओमध्ये म्हणतो की, आमदार सुरेश धस यांना अनेक प्रकरणांतून वाल्मीक कराडनेच वाचवलं आहे. याशिवाय, आण्णा (वाल्मीक कराड) बाहेर आल्यावर सर्वांचं बघणार, असं धमकीचं वक्तव्यही त्याने केलं आहे. संदीप तांदळे याच्यावर 307 (खुनाचा प्रयत्न) अंतर्गत तीन गुन्हे, खंडणी, पोक्सो (POCSO) सारख्या गंभीर स्वरुपाचे गुन्हे नोंद असल्याची माहिती मिळाली आहे. इतकंच नव्हे तर बाळा बांगर यांच्यावर 307 च्या तीन केस करण्यातही तांदळेचं नाव पुढे आलं आहे.

तांदळे सारखा गुन्हेगार खुल्या रस्त्यावर फिरत आमदारांना धमक्या देतो, शिवीगाळ करतो आणि तुरुंगात असलेल्या गुंडाच्या नावाने दहशत पसरवत असून देखील बीड पोलीस कुठलीही कारवाई करत नाहीये. यामुळे पोलिसांच्या भूमिकेवर संशय व्यक्त केला जात आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra Politics : शिंदे गटाला हादरा, बड्या नेत्यांचा भाजपमध्ये पक्षप्रवेश

Eknath Shinde : मराठा आरक्षण आंदोलनाच्या पडद्यामागं कोण होतं? एकनाथ शिंदे म्हणाले...VIDEO

Pune Ganeshutsav : पुण्यातील गणपती विसर्जन मिरवणुकीबाबत पोलिसांचा मोठा निर्णय

बलात्कार पीडितेला आरोपीच्या घरी पाठवलं, नराधमानं पुन्हा केले अत्याचार, बालकल्याण समितीच्या अध्यक्षांसह १० जणांवर गुन्हा

HIV: एचआयव्हीच्या रुग्णांनी चुकूनही करु नये 'या' गोष्टी, अन्यथा...

SCROLL FOR NEXT