Vaishnavi Hagwane saam tv
Video

Vaishanavi Hagwane: हगवणेंच्या मटण पार्टीनंतर हॉटेलच्या रूमला टाळं|VIDEO

Rajendra Hagwane: वैष्णवी हगवणे आत्महत्या प्रकरणामुळे राज्यभर संताप उसळला असतानाच, आरोपी बाप आणि मुलाचा मटणावर ताव मारतानाचा व्हिडिओ व्हायरल झाला आहे. या व्हिडीओमुळे नागरिकांमध्ये प्रचंड संताप व्यक्त केला जात आहे.

Omkar Sonawane

वैष्णवी हगवणे आत्महत्या प्रकरणामुळे संपूर्ण राज्यात संतापाची लाट उसळली आहे. जमीन खरेदीसाठी माहेरून दोन कोटी रुपये आणावेत यासाठी सुनेचा वारंवार मानसिक आणि शारीरिक छळ करून तिच्या मृत्यूला कारणीभूत ठरणारा हावरट राजेंद्र हगवणेच्या अखेर पोलिसांनी मुस्क्या आवळल्या. सून वैष्णवी हगवणेच्या मृत्यूनंतर अनेक धक्कादायक खुलासे झाले असून पोलिसांनी चार्जशीटमध्ये खुनाचा संशय देखील व्यक्त केला आहे.

वैष्णवीच्या मृत्यूनंतर राजेंद्र हगवणे आणि दीर सुशील हगवणे हे फरार होते. पोलिसांनी त्यांना अटक केली आहे हे दोघेही नराधम गेल्या सात दिवसापासून लपून बसले होते. आज पहाटे साडेचार वाजता पोलिसांनी त्यांच्या मुस्क्या आवळल्या आहेत. 16 मे रोजी वैष्णवीचा मृत्यू झाला होता, मात्र, राजेंद्र हगवणे दुसऱ्या दिवशी वडगाव मावळमध्ये हॉटेल तांबडा पांढरा या ठिकाणी मटणावर ताव मारत होता. 17 मे रोजी हगवणे मित्रांबरोबर वडगाव मावळमध्ये मटणावर ताव मारताना दिसला हॉटेल तांबडा पांढराचा मालक मोहन भेगडे आणि राजेंद्र हगवणे हे दोघे तालमीतील मित्र आहेत. त्यामुळे हगवणे हॉटेलमध्ये जेवायला आला होता, यानंतर आता ते हॉटेलच्या रूमला टाळा लावण्यात आलेले आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

CJP ला झटका; शिवाजी पार्कवरच्या आंदोलनाला मुंबई पोलिसांनी परवानगी नाकारली

IND vs WI 1st ODI: विराट कोहलीची शतकीय खेळी; ८ गडी राखून भारताचा वेस्ट इंडिजवर शानदार विजय

किंग कोहलीने इतिहास रचला; ‘विराट’ षटकारासह ‘रन मशिनचे ५५ वे शतक, सचिन तेंडुलकरचे दोन मोठे विक्रम

Maharashtra News Live Update: भामरागडमधून दिलासादायक बातमी; पुराचे पाणी हळूहळू ओसरू लागले

साधेपणाने लग्न केलेल्यांना मुलं झाली नाहीत का? दुष्काळाच्या पार्श्वभूमीवर विखेंचं अजब विधान

SCROLL FOR NEXT