संत ज्ञानेश्वर महाराजांचा पालखी सोहळा सोलापूर जिल्ह्यातुन मार्गस्थ झाला आहे. सोलापूर जिल्ह्यातील भंडीशेगावातील मुक्काम उरकून आजचा मुक्काम हा वाखरी या ठिकाणी होणार आहे. संत ज्ञानेश्वर महाराज पालखी सोहळ्यातील दुसरे उभे रिंगण आणि चौथे गोल रिंगण बाजीराव विहीर वाखरी या ठिकाणी होणार आहे. संत ज्ञानेश्वरांच्या पालखी सोहळ्यात पंखा मानकऱ्यांचं महत्त्व मोठं असतं. ज्यावेळेस पालखी स्थळावरुन हलते तेव्हा पंखा मानकरी पालखीला पंखा घालण्यासाठी असतो तर वारकरी अनिल हेंद्रे यांनी पंखा मानकऱ्यांची भुमीका अनेक वर्षांपासून जोपासली आहे. तसेच वारीदरम्यान वारकरी संस्थांचे बाल वारकरी पालखी तळावर भजन म्हणत मैदानी खेळ खेळत होते. पावले खेळण्याची परंपरा ही वारकऱ्यांमध्ये असते हीच परंपरा या बाल वारकऱ्यांनी जपलेली पाहायला मिळाली.
सकाळ+चे सदस्य व्हा
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.