UPI सेवेमध्ये मोठी तांत्रिक समस्या उद्भवली आहे. हजारो युजर्सना पेमेंट आणि फंड ट्रान्सफर करताना अडचणी येत आहेत. यामुळे अनेक लोकांना अडथळ्यांचा सामना करावा लागत होता. अनेक युजर्सनी त्यांच्या अडचणी सोशल मीडियावर मांडल्या होत्या. Google Pay आणि PhonePe यासारख्या लोकप्रिय अॅप्सवरही या समस्येचा परिणाम झाला होता. युजर्सनी X (ट्विटर) वर पोस्ट करत आपल्या समस्यांची माहिती दिली.
owndetector च्या अहवालानुसार, संध्याकाळी ७ वाजल्यापासून ही समस्या सुरू झाली होती. आतापर्यंत जवळपास २३,००० तक्रारी नोंदवण्यात आल्या आहेत. अनेक युजर्सना पैसे पाठवताना अडचणी येत होत्या, तर काहींना पैसे मिळवताना समस्या निर्माण झाली होती.
यामुळे ८२% युजर्सना पेमेंट करण्यात अडचण येत होती . १३% युजर्सना फंड ट्रान्सफर करताना अडचण जाणवली तर ४% युजर्सना अॅप वापरण्यात समस्या आली. मात्र यानंतर सर्व सेवा पाहिल्यासारखी सुरळीत झाली आहे
सकाळ+चे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.