Yeola Rainfall SaamTv
Video

Nashik News : अवकाळीने शेतकऱ्यांवर आणली संक्रांत; येवला तालुक्यात उभी पिकं झाली आडवी, पाहा Video

Yeola Heavy Rainfall News : राज्यात अवकळीची शक्यता वर्तवण्यात आल्यानंतर काल राज्यात अनेक भागात जोरदार पावसाने हजेरी लावली. यात नाशिक जिल्ह्यातील येवला तालुक्यात झालेल्या पावसाने काढणीला आलेल्या पिकांचं नुकसान झालं आहे.

Saam Tv

नाशिकच्या येवला तालुक्यातील नगरसुक गावात अवकाळी पावसाने मोठं नुकसान झालं आहे. या बेमोसमी पावसाने गहू, कांदा, कापूस आणि काढणीला आलेल्या पिकांना मोठा फटका बसला आहे.

नाशिक जिल्ह्याच्या येवला तालुक्यात काल झालेल्या अवकाळी पावसाने शेतकऱ्यांच्या हातातोंडाशी आलेला घास हिरावून घेतला आहे. अवकाळी पावसाचा जोर इतका होता की काढणीला आलेली उभी पिकं झोपली आहे. त्यामुळे संक्रांतीपूर्वीच शेतकऱ्यांवर संक्रांत आली आहे. आधीच शेती पिकांना भाव मिळत नसल्याचे शेतकरी हैराण होते त्यात बेमोसमी पावसाने होतं नव्हतं पीक वाया गेलं आहे. त्यामुळे येथील शेतकऱ्यांवर सुल्तानी आणि आसमानी अशी दोन्ही संकटं आलेली दिसत आहेत. या नुकसानग्रस्त पिकांचे तातडीने पंचनामे होऊन नुकसान भरपाई मिळावी अशी मागणी आता शेतकऱ्यांकडून होत आहे.

राज्यात गारपीट आणि मुसळधार पावसाचा अंदाज असल्याची शक्यता हवामान विभागाने २ दिवसांपूर्वीच वर्तवली होती. वर्ष अखेरीस थंडीची लाट ओसरून पावसाची शक्यता असल्याने सतर्कतेचा इशारा देण्यात आला होता. राज्यातील काही जिल्ह्यात यलो अलर्ट देखील हवामान विभागाने जारी केला होता. त्यानंतर काल काही ठिकाणी अवकाळी पावसाने जोरदार हजेरी लावली. या अवकाळीमुळे शेतकऱ्यांचे मात्र मोठे नुकसान झाले आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Bihar Elections: एनडीएला मोठा धक्का! निवडणूक न लढताच गमावली एक जागा ? काय कारण, पराभूत उमेदवार कोण?

Isha Malviya: शेकी गर्ल ईशा मालवीयाचा नवा एथनिक लूक पाहिलात का?

Ind vs Aus : भारत-ऑस्ट्रेलिया वनडे सामना होणार रद्द? पर्थच्या हवामानाच्या अंदाजानं पहिल्या मॅचवर संकट

Heart Attack Prevention: हार्ट अटॅक अन् स्ट्रोक 'या' चुकांमुळे होतो, उपाय वेळीच जाणून घ्या, नाहीतर...

Maharashtra Live News Update : - मुख्यमंत्र्यांच्या भेटीनंतर पहिल्यांदाच माजी आमदार राजन पाटील माध्यमासमोर

SCROLL FOR NEXT