अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी संसद भवनात आज २०२५ चा केंद्रीय अर्थसंकल्प सादर केला. यात रोजगार आणि पर्यटन व्यवसायाला चालना देणाऱ्या योजनांच्या त्यांनी घोषणा केल्या आहे.
अर्थमंत्र्यांनी सांगितलं की, सर्व राज्यांच्या सहभागाने ५० पर्यटन स्थळे विकसित केली जाणार आहेत. रोजगाराभिमुख वाढीसाठी आतिथ्य व्यवस्थापन संस्थांसाठी कौशल्य विकास कार्यक्रम आयोजित केले जाणार असून प्रवास आणि कनेक्टिव्हिटी सुधारण्यासाठी, गृहमुक्कामासाठी मुद्रा कर्ज देण्यात येणार आहे. व्हिसा शुल्क माफ करून ई-व्हिसाचा आणखी विस्तार. वैद्यकीय पर्यटन आणि आरोग्य लाभांना प्रोत्साहन दिले जाईल. तर संशोधन, विकास आणि नवोन्मेषासाठी २० हजार कोटी रुपये बजेट असणार आहे.
लघु उद्योगांसाठी विशेष क्रेडिट कार्ड देण्यात येणार असून पहिल्या वर्षी १० लाख कार्ड जारी केले जातील. शहरी कामगारांची स्थिती सुधारण्यासाठी, रस्त्यावरील विक्रेत्यांसाठी पंतप्रधान स्वानिधी योजनेची कर्ज मर्यादा ३० हजार रुपयांपर्यंत वाढवली. स्टार्टअप्ससाठी देण्यात येणारे कर्ज १० कोटी रुपयांवरून २० कोटी रुपये केले असून हमी शुल्कातही कपात केली जाणार आहे. MSME कर्ज हमी कव्हर ५ कोटी रुपयांवरून १० कोटी रुपये करण्यात आले असून यात १.५ लाख कोटी रुपयांपर्यंत कर्ज उपलब्ध असणार आहे.
खेळणी उद्योगासाठी एक विशेष योजना मेक इन इंडिया अंतर्गत सुरू केली जाईल. देशाला खेळण्यांचे प्रमुख केंद्र बनवण्यासाठी राष्ट्रीय कृती आराखडा तयार केला जाणार आहे. एक इको सिस्टम कौशल्य आणि उत्पादनासाठी तयार केली जाईल. यामुळे उच्च दर्जाची, अद्वितीय, नाविन्यपूर्ण आणि दीर्घकाळ टिकणारी खेळणी तयार होतील.
सकाळ+चे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.