Ulhasnagar Saam TV
Video

Ulhasnagar : जामिनावर सुटून मिरवणुक काढणाऱ्या आरोपीचा माज उतरवला | VIDEO

Ulhasnagar : उल्हासनगरमध्ये पोलिसांची कडक कारवाई केली आहे. आरोपीची धिंड काढत मिरवणुकीचा माज उतरवला आहे. आरोपीचीचे नाव दिवाकर यादव असे आहे.

ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई

उल्हासनगरच्या रमाबाई टेकडी परिसरात मारहाण प्रकरणी आरोपी दिवाकर यादव आणि इतरांवर गुन्हा दाखल करण्यात आला होता. आरोपी जामिनावर सुटल्यानंतर त्यांच्या समर्थकांनी फटाके फोडत आणि मिरवणूक काढत आनंद व्यक्त केला. या प्रकाराचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाल्यानंतर उल्हासनगर पोलिसांनी तात्काळ लक्ष घालून कडक कारवाईचा बडगा उगारला आहे.

पोलिसांनी या मिरवणुकीचा माज उतरवत त्याच परिसरात आरोपीची धिंड काढली. पोलिसांच्या या निर्णायक आणि धडाकेबाज कारवाईमुळे संपूर्ण परिसरात एकच खळबळ उडाली आहे. कायद्याचा गैरवापर करणे आणि गुन्हेगारांना हिरो बनवण्याचा प्रयत्न करणाऱ्यांवर पोलिसांचा दणका बसला आहे.पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, गुन्हेगारी कृत्यांनंतरही समाजात दहशत निर्माण करणाऱ्या प्रवृत्तींना रोखण्यासाठी ही कारवाई केली गेली आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Shocking : बाई, काय हा प्रकार... पत्नीपासून सुटका मिळवण्यासाठी तरुणाने देवीला घातलं साकडं; नवस पूर्ण होताच काय केलं? वाचा

Maharashtra Politics: अकोल्यात मोठी राजकीय घडामोड, १६ नगरसेवकांचे तडकाफडकी निलंबन; कारण आलं समोर

अवकाळी पाऊस आणि गारपिटीचा फटका; नाशिकमध्ये गहू पिकाचे मोठे नुकसान|VIDEO

ऑन ड्युटी सहायक पोलीस उपनिरीक्षकाचा हार्ट अटॅकने मृत्यू, पोलीस दलात शोककळा

FASTag Annual Pass Price: हायवेवरुन प्रवास करणे महागणार! १ एप्रिलपासून फास्टॅग पास फी वाढणार; किती पैसे मोजावे लागणार? वाचा

SCROLL FOR NEXT