Doctors and hospital staff protest outside Ulhasnagar Central Hospital after alleged assault and vandalism by patient’s relatives. saam tv
Video

उल्हासनगर रुग्णालयात रुग्णाच्या मृत्यूनंतर राडा; डॉक्टरांवर हल्ला अन् हॉस्पिटलची तोडफोड|VIDEO

Doctors Strike After Hospital Vandalism In Ulhasnagar: उल्हासनगर जिल्हा मध्यवर्ती रुग्णालयात रुग्णाच्या मृत्यूनंतर नातेवाईकांनी तोडफोड आणि डॉक्टरांना मारहाण केल्याची घटना घडली.

Omkar Sonawane

अजय दुधाने, साम टीव्ही

उल्हासनगर जिल्हा मध्यवर्ती रुग्णालयामध्ये बुधवारी रात्री दीडच्या सुमारास रुग्णाच्या मृत्यूनंतर नातेवाईकांनी रुग्णालयाची तोडफोड केली होती यामध्ये काही डॉक्टरांना धक्काबुक्की देखील करण्यात आली होती या विरोधात सर्व डॉक्टर आणि कर्मचाऱ्यांनी काम बंद आंदोलन सुरू केलं आहे. उल्हासनगर जिल्हा मध्यवर्ती रुग्णालयामध्ये भगवान निंबोरे हा रुग्ण उपचार घेत असताना त्याचा बुधवारी रात्री एक ते दीड च्या सुमारास त्याचा मृत्यू झाला मृत्यू झाल्यानंतर संबंधित नातेवाईकांनी रुग्णालयाची तोडफोड करत डॉक्टरांना धक्काबुक्की करत मारहाण केले. तसेच रुग्णालयातील काचा देखील फोडण्यात आला. या विरोधात आज सकाळपासूनच रुग्णालयातील कर्मचारी आणि डॉक्टरांनी काम बंद आंदोलन सुरू केले आहे.

दरम्यान घटनेस्थळी पोलीस आणि महापौर अश्विनी निकम हे दाखल झाले असून संबंधित व्यक्तीवर गुन्हा आणि त्याला अटक करण्याची मागणी डॉक्टर आणि कर्मचाऱ्यांकडून केली जात आहे, यावेळी डॉक्टरांनी संबंधित राजकीय कार्यकर्ते अशा तोडफोड करत असतात त्यामुळे त्यांच्यावर देखील गुन्हा दाखल करण्याची मागणी यावी करण्यात आली. याबाबत महापौरांनी हे सर्व आरोप फेटाळत ते आमचे कार्यकर्ते नाहीत आम्ही जनतेचे सेवक आहोत संबंधित जो कोणी असेल त्याच्यावर गुन्हा दाखल होणार अशी प्रतिक्रिया महापौर यांनी दिली आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

सकाळी चहाऐवजी प्या 'हे' पाणी; महिनाभरात चरबी वितळेल, दिसाल एकदम बारीक!

Maharashtra News Live Update: कल्याणमध्ये दुर्गाडी किल्ल्यावर शिंदेसेनेचे आंदोलन

Ebola Virus: जीवघेण्या व्हायरसची भारतात एंट्री; लक्षणे दिसताच अहमदाबादमध्ये एकजण आयसोलेट

Cardamom Benefits: जेवणानंतर दररोज खा वेलची; शरीरात होतील 8 बदल, अपचनाचाही त्रास होईल कमी

SRH vs RR, IPL 2026: वैभव सूर्यवंशीची फटकेबाजी अन् आर्चरच्या भेदक गोलंदाजी पुढे हैदराबाद गारद; आता गुजरातशी भिडणार राजस्थान

SCROLL FOR NEXT