भाजप सध्या बटेंगे तो कटेंगेचा नारा देत आहे. पण येथे कुणीच बटणार नाही किंवा कटणार नाही. उलट या लोकांनीच देशात गरीब व श्रीमंत अशी दरी पाडण्याचं पाप केलं. मी मुख्यमंत्री असताना कोण कटले? मी सर्वांना सोबत घेऊन पुढे जात होतो. पण त्यांनी गद्दारी करून यांनी सरकार पाडलं. आता हे लोक आपल्या नोकऱ्या आणि उद्योग गुजरातला पळवण्याचं काम करताय. 23 तारखेनंतर राज्यात महाविकास आघाडीचे सरकार येणार आहे. आता जा तिकडेच ढोकळा खायला, अशी टीका करत उद्धव ठाकरे यांनी भाजप आणि महायुती सरकारवर आसूड उगारला. सोमवारी कर्जत येथे आयोजित प्रचारसभेत ते बोलत होते.
पुढे बोलताना उद्धव ठाकरे म्हणाले की, या लोकांनी जनतेला धोके देऊन स्वतःला खोके घेतले. त्यांच्याकडे विकासाचा कोणताही हिशेब नाही. राज्यातील ज्या - ज्या ठिकाणी गद्दारी झाली त्या ठिकाणी हेच चित्र आहे. या मतदारसंघांत अनेक कंत्राटे देण्यात आले. सरकारच्या तिजोरीतून पैसा देण्यात आला, पण तो शेवटच्या घटकापर्यंत पोहोचलाच नाही. आता 50 खोके यांच्यासाठी सुटे पैसे झालेत. या लोकांनी हजारो कोटींनी महाराष्ट्र लुटला आहे, अशी टीका त्यांनी केली.
या निवडणुकीत पैशाचा महापूर आला आहे. माझ्या उमेदवारांकडे तेवढे पैसे नाहीत. शिवसैनिकांनी आपल्या निष्ठेचा खडक त्यात वाहून जाऊ देऊ नये. महापूर येतो आणि जातो. पण पैसे घेऊन मते विकत घेणारी ही औलाद महाराष्ट्राला काय सुख देणार? या लोकांनी ठिकठिकाणी जाहिरातबाजी सुरू केली आहे. केलंय काम भारी, लुटली तिजोरी. केली गद्दारी, पुढे लाचारी, असंही ठाकरे यांनी म्हंटलं आहे.
Edited By Rakhi Rajput
सकाळ+चे सदस्य व्हा
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.