शिवसेना ठाकरे गटाचा निर्धार मेळावा आज मुंबईमध्ये पार पडत आहे. या मेळाव्यामध्ये आदित्य ठाकरे यांनी व्होट चोरीचा बॉम्ब टाकत अनेक पुरावे सादर करुन निवडणूक आयोगावर गंभीर आरोप केले. यानंतर उद्धव ठाकरे यांनी उपस्थितांना संबोधित करत भाजपवर जोरदार हल्लाबोल केला. ठाकरे म्हणाले, आदित्य ने जे काही पुरावे दाखवले ते फक्त वरळीमधील होते. आपल्याला यामध्ये अजून खोलवर जायचं असून मुंबई आणि महाराष्ट्रामध्ये कशी मतचोरी झाली हे दाखवायचे आहे.
त्याची सुरुवात मुंबईपासून करायची आहे. कारण मुंबईवर दोन व्यापाऱ्यांचा डोळा आहे. आज एकजण मुंबईमध्ये येऊन गेला आणि आज मी सामनामध्ये पहिल्या पानावर एक बातमी वाचली की भाजप कार्यालयाचे उद्घाटन होणार आहे. त्या कार्यालयासाठी भाजपने कशी जागा मिळवली ते आहेच. आणि आतल्या पानावर एक बातमी आहे की जिजामाता उद्यानावर अॅनाकोंडा येणार आहे. अॅनाकोंडा म्हणजे सगळं गिळणारा साप! आणि तो आज इथे येऊन गेला आणि भूमिपूजन करून गेला. त्यांना मुंबई गिळायची आहे. कशी गिळतो ते बघतोच नाही तुझं पोट फाडून बाहेर आलो तर... नावाचा नाही असा घणाघाती इशारा उद्धव ठाकरे यांनी अमित शाह यांना दिला.
सकाळ+चे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.