nashik news  saam tv
Video

Uddhav Thackeray: हिंदूंना दिली घंटा आणि त्यांना दिली सौगात; उद्धव ठाकरे नेमकं काय म्हणाले?|VIDEO

You Gave Bells to Hindus, Gifts to Others: विधानसभा निवडणुकीत झालेल्या पराभवानंतर ठाकरे गटाने पुन्हा एकदा आगामी महापालिकेसाठी मोर्चे बांधणी सुरू केली आहे. त्याच अनुषंगाने आज नाशिकमध्ये ठाकरे गटाचे निर्धार शिबिर पार पडले.

Omkar Sonawane

नाशिकमध्ये पार पडलेल्या निर्धार शिबिरामध्ये उद्धव ठाकरेंनी भाजपवर तोफ डागली असून शिवसैनिकांना पुन्हा नव्याने महापालिका निवडणुकीच्या कामाला लागण्याच्या सूचना उद्धव ठाकरे यांनी दिल्या.

उद्धव ठाकरे म्हणाले, सत्ता टिकवण्यासाठी तुम्ही सत्ता जिहाद केला, आणि कडवट शिवसेनेला दूर करून मशिदीत जाणाऱ्या चंद्रबाबूला सोबत घेतले. आणि आम्हाला सांगता तुम्ही हिंदुत्व सोडले अशी टीका ठाकरे यांनी निर्धार मेळाव्यात केली.

तुमच हिंदुत्व आहे तरी काय ? असा सवाल करत आम्हाला बाळासाहेबांनी हिंदू मुस्लिम म्हणून नाही तर राष्ट्रीयत्व म्हणून तुमच हिंदुत्व असले पाहिजे हे शिकवले आहे. जो या देशासाठी मरायला तयार आहे, जो या देशाला मातृभूमि मानतो, माझा देश मानतो मग तो कोणत्याही जातीचा असो अशी शिकवण आम्हाला पक्षप्रमुखांनी शिकवली आहे.

हिंदू मुस्लिमांना एकमेकांवर दगड मारायला लावतात आणि त्या दगडांवर उभ राहून सत्ता भोगतात अशी घणाघाती टीका उद्धव ठाकरे यांनी केली. हनुमान जयंती आणि रामनवमीला भाजपचे कितीलोक तुमच्या घरात आले. पण रमजान ईदला 32 लाख मुस्लिमांना यांनी स्वतःच्या पैशांनी 'सौगात ए मोदी' भेट म्हणून दिले. याचा आनंद आहे पण निवडणुकीच्या वेळेस 'बटेंगे तो कटेंगे' अशी सडकून टीका उद्धव ठाकरे यांनी नाशिकच्या निर्धार शिबिरात भाजपवर केली.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Ashadhi Ekadashi : अवघे गरजे पंढरपूर…! मुख्यमंत्री फडणवीसांच्या हस्ते विठुरायाची शासकीय महापूजा संपन्न

Pune Crime : पुण्यातील प्रसिद्ध रीलस्टारवर जीवघेणा हल्ला, तिघांकडून बेदम मारहाण; शहरात खळबळ

Hafiz Saeed: मुंबई हल्ल्याच्या मास्टर माईंड हाफिसला भारताच्या ताब्यात देणार पाकिस्तान; प्रत्यार्पणासाठी ठेवली मोठी अट

Dry Fruits: पावसाळ्यात ड्राय फ्रुट्स साठवण्यासाठी वापरा 'या' सिंपल टिप्स

Sunday Horoscope : आषाढी एकादशीला होणार विष्णूची कृपा; 'या' राशींच्या लोकांवर धनाचा वर्षाव होणार

SCROLL FOR NEXT