Uddhav Thackeray: 'लबाडांनो, पाणी द्या' पाण्याच्या लढाईसाठी स्वतः उद्धव ठाकरे मैदानात|VIDEO

SambhajiNagar Water Woes:आगामी महापालिकेच्या पार्श्वभूमीवर ठाकरे गट हा मैदानात उतरला असून छत्रपती संभाजीनगर मध्ये स्वतः उद्धव ठाकरे हे रस्त्यावर उतरून पाण्यासाठी आंदोलन करणार आहे.

अनेक वर्षांपासून मराठवाडा हा दुष्काळी भाग म्हणून ओळखला जातो. आजही संभाजीनगर आणि संपूर्ण मराठवाड्यातील पाणीटंचाई कायम आहे. केवळ घोषणांचा पाऊस पडत आहे, पण पिण्याचे पाणी मात्र अद्याप सामान्य जनतेपर्यंत पोहोचलेले नाही.

या पाणीटंचाईच्या विरोधात ठाकरे गट आक्रमक झाला आहे. १६ एप्रिलपासून 'लबाडांनो, पाणी द्या' या घोषणेखाली ठाकरे आंदोलनाची मोहीम सुरू होणार आहे. तसेच १३ ते १५ मे दरम्यान स्वतः उद्धव ठाकरे संभाजीनगरच्या पाणीप्रश्नासाठी मैदानात उतरतील.

छत्रपती संभाजीनगरमध्ये गेली २० वर्षांपासून पिण्याच्या पाण्याचा प्रश्न गंभीर आहे. या काळात अनेक वेळा सत्ताधाऱ्यांविरोधात आंदोलने झाली. काही वर्षांपूर्वी महापालिकेत शिवसेनेची सत्ता होती. मात्र शिवसेना दोन गटात फुटल्यानंतर, आता ठाकरे गटाने शिंदे गटाविरोधात आंदोलनाचा निर्धार केला आहे.

या आंदोलनाचे नेतृत्व माजी खासदार चंद्रकांत खैरे करणार असून, विशेष म्हणजे ते स्वतः २० वर्षे खासदार असताना देखील पाणीप्रश्न मार्गी लागलेला नाही. आता तेच या आंदोलनात अग्रस्थानी राहणार आहेत.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com