Rajan Salvi and Uddhav Thackeray saam tv
Video

Maharashtra Politics : ....निकला चूहा! राजन साळवींच्या शिवसेना प्रवेशावर ठाकरेंच्या नेत्याची विखारी टीका, VIDEO

Rajan Salvi -Vinayak Raut : राजन साळवी एकनाथ शिंदेंच्या शिवसेनेत प्रवेश करणार आहेत. त्यानंतर ठाकरे गटाचे नेते विनायक राऊत यांनी साळवी यांच्यावर जहरी शब्दांत टीका केली आहे.

Nandkumar Joshi

माजी आमदार राजन साळवी यांनी ठाकरे गटाचा राजीनामा दिला आहे. ते एकनाथ शिंदेंच्या नेतृत्वात शिवसेनेत प्रवेश करणार आहेत. राजन साळवींचा शिवसेना प्रवेश हा उद्धव ठाकरे गटासाठी मोठा धक्का मानला जात आहे. त्याचवेळी ठाकरे गटाचे नेते आणि माजी खासदार विनायक राऊत यांनी साळवींवर जहरी टीका केली आहे.

ज्या सामंत कुटुंबीयांविरोधात आरोळी ठोकत होते, त्याच सामंत कुटुंबीयांचे नोकर म्हणून काम करावं लागणार आहे. त्यांच्यावर ओढवलेली नामुष्की आहे, असे विनायक राऊत म्हणाले.

नारायण राणे आणि विनायक राऊत यांच्यावर राजन साळवी नेहमी टीका करायचे, तसेच राजीनामा पत्रात पराभवाची जबाबदारी स्वीकारतो असा उल्लेख त्यांनी केला आहे. त्याबाबत विचारणा केली असता. साळवींना कुठेतरी सद्बुद्धी दिली असावी म्हणून त्यांनी पत्रात तसा उल्लेख केला आहे. पण राजन साळवींना नारायण राणेंवर टीका करण्याचा अधिकार राहिला नाही, असे राऊत म्हणाले.

यापूर्वी सुद्धा नीलेश राणे यांनी राजापूरमध्ये सभेत राजन साळवींनी प्रत्येक निवडणुकीत आमच्याकडून कसे पैसे घेतले हे जाहीरपणे सांगितले होते. त्यामुळे राणेंवर टीका करण्याचा अधिकार साळवींना नाही. त्यांची कीव करावीशी वाटते. विधानसभेत पराभव झाल्यानंतर अनेक बैठका घेतल्या. भाजपसोबत जाणार, फडणवीस आम्हाला हे देणार, ते देणार असे सांगत सुटले होते. आता त्याच भाजपला सोडून शिंदे गटात जावे लागते हे त्यांचे दुर्देवं आहे. खोदा पहाड निकला चुहा अशी परिस्थिती त्यांची झाली आहे, असा खोचक टोला राऊत यांनी लगावला.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra Live News Update : नाशिक महापालिका निवडणुकीच्या अंतिम टप्प्यात नेत्यांच्या सभांना वेग

Mumbai Fire : घरातील फ्रीजचा अचानक स्फोट, ३ जणांचा जिवंत जळून मृत्यू, मुंबईतील भयानक घटना

Success Story: मराठी माध्यमातून शिक्षण, आधी MBBS मग UPSC; सोलापूरचे भगवंत पवार झाले वैद्यकीय अधिकारी

Mumbai Local Mega Block: मुंबईकरांसाठी महत्त्वाची बातमी! आज आणि उद्या मध्य रेल्वेवर मेगा ब्लॉक; वेळापत्रक पाहूनच घराबाहेर पडा

अंबरनाथ नगरपालिकेत नवा ट्विस्ट; भाजपच्या खेळीवर शिंदेसेनेची कुरघोडी

SCROLL FOR NEXT