Uddhav Thackeray calls urgent meeting saam tv
Video

Maharashtra Politics : महाराष्ट्राच्या राजकारणात मोठी उलथापालथ होणार, मातोश्रीवर खलबतं

Uddhav Thackeray Calls Urgent Meeting : उद्धव ठाकरेंच्या निवासस्थानी आज मातोश्रीमध्ये ठाकरे गटाच्या नेत्यांची एक महत्वाची बैठक झाली आहे.

Saam Tv

महाराष्ट्राच्या राजकारणात मोठी उलथापालथ होणार, मातोश्रीवर खलबतं

मध्यंतरीच्या काळात ठाकरे गटाचे खासदार हे शिंदेंच्या शिवसेनेच्या वाटेवर आहे अशी चर्चा राजकीय वर्तुळात रंगली होती. त्यानंतर ठाकरेंच्या खासदारांनी दिल्लीमध्ये पत्रकार परिषद घेऊन आम्ही सर्व उद्धव ठाकरेंसोबत आहोत याचा पुरावा दिल होता. परंतु या पत्रकार परिषदेत ईशान्य मुंबईचे खासदार संजय दिना पाटील हे अनुपस्थित होते. त्यानंतर उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना देण्यात आलेल्या महादजी शिंदे पुरस्कार सोहळ्यात संजय दिना पाटील यांनी उपस्थिती लावल्याचे फोटो झळकले. त्यानंतर सर्वांच्याच राजकीय भुवया उंचवल्या .

याच अनुषंगाने आज ठाकरे गटाची आज मातोश्रीवर उद्धव ठाकरेंनी बैठक बोलावली होती.ठाकरे गटाचे नेते राजन साळवी यांनी काल मोठे शक्तिप्रदर्शन करत एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेते प्रवेश केला. आज रत्नागिरीत देखील ऑपरेशन टायगर झाल्याचे पाहायला मिळाले. एकूणच उबाठा पक्षाला मोठी खिंडार पडली आहे. ठाकरेंचे कोकणातले महत्वाचे नेते भास्कर जाधव हे देखील नाराज असल्याच्या चर्चा सध्या सुरू आहे. या कारणामुळे आज मातोश्रीवर विनायक राऊत, अनिल परब आणि संजय राऊत यांच्यासह मातोश्रीवर महत्वाची बैठक झाली. आता या बैठकीत नेमकी काय चर्चा झाली? या बैठकीमुळे पक्षाला लागलेली गळती थांबणार का हे बघणे महत्वाचे ठरेल.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

प्रसिद्ध दिग्दर्शकाचा हॉटेल रुममध्ये आढळला मृतदेह; २८ वर्षीय डायरेक्टरच्या निधनाने सिनेसृष्टीत शोककळा

Sunday Horoscope: पैशाची तंगी जाणवेल, 3 राशींचे भाग्य उजळेल; वाचा रविवारचं राशीभविष्य

Durga Puja Pandal: दुर्गा पूजेचा मंडप कोसळला; चेंगराचेंगरीत १७ जणांचा मृत्यू

दिल्लीतील आंदोलनाची धग थेट लंडनपर्यंत, ध्रुव राठीने सांभाळली लंडनमध्ये आंदोलनाची धुरा

गुरांच्या चाऱ्याला तिजोरीचं कुलूप, दुष्काळासोबत चोरीचंही संकट

SCROLL FOR NEXT