Uddhav Thackeray addresses supporters at Shivaji Park while backing Sonam Wangchuk’s protest against the central government. saam tv
Video

आता सरकार बदलण्याचा लढा सुरू झाला पाहिजे; उद्धव ठाकरेंनी फुंकलं रणशिंग|VIDEO

Uddhav Thackeray speech on Sonam Wangchuk protest: उद्धव ठाकरे यांनी सोनम वांगचुक यांच्या आंदोलनाला पाठिंबा देत केंद्र सरकारवर जोरदार हल्लाबोल केला. सरकार बदलण्याची वेळ आली असल्याचे सांगत त्यांनी तरुणांना नेतृत्वासाठी पुढे येण्याचे आवाहन केले.

Omkar Sonawane

दिल्लीच्या जंतरमंतरवर मागच्या अनेक दिवसांपासून कॉक्रोच जनता पार्टीचे आंदोलन सुरू आहे, या आंदोलनाला पाठिंबा देण्यासाठी उद्धव ठाकरे यांची शिवसेना रस्त्यावर उतरून पाठिंबा देत आहे. सोनम वांगचुकांच्या उपोषणाला पाठिंबा देण्यासाठी शिवाजी पार्क परिसरात आज ठाकरेंच्या शिवसेनेकडून आंदोलन केले गेले. यावेळी उद्धव ठाकरे यांनी जोरदार तोफ डागली. ठाकरे म्हणाले, धर्मेंद्र प्रधान यांचा राजीनामा हा क्षुल्लक आहे. आता सरकार बदलण्याचा लढा सुरू झाला पाहिजे. हा लढा एकट्या सोनम वांगचूक यांचा नाही. सरकार बदलेपर्यंत ही आग धगधगती राहिली पाहिजे. तसेच तरुणांनी आता नेते व्हायला हवे असे आवाहन उद्धव ठाकरे यांनी केले.

दिल्लीत युद्धाची तयारी सुरू झाली असून ही सरकार बदलेपर्यंत ही आग धगधगती राहायला पाहिजे. हे सरकार पाकिस्तानसोबत चर्चा करायला तयार आहे पण सोनम वांगचूक यांच्यासोबत यांना चर्चा करायची नाहीये. ज्या देशाने भारतात आतंगवादी घुसवले हे त्यांच्यासोबत चर्चा करणार पण ज्यांचे देशासाठी योगदान आहे, त्यांना हे सरकार काय देत आहे ते आपण बघितले असा जोरदार हल्लाबोल उद्धव ठाकरे यांनी भाजप आणि पंतप्रधान नरेंद्र मोदींवर केला.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

कुत्र्याच्या हल्ल्यात 150 जण जखमी ; कुत्र्याच्या शोधासाठी पोलीस मैदानात

काँग्रेसला पुन्हा मोठा धक्का; प्रदेशाध्यक्षांच्या जिल्ह्यातील माजी आमदार भाजपमध्ये करणार प्रवेश?

Ram Temple: राममंदिर चोरीविरोधात साधू-संत रस्त्यावर; पंतप्रधान निवासस्थानाकडे साधू करणार आंदोलन

खड्डयांमुळे 20 कंपन्या चाकण सोडणार? खड्डे आणि वाहतूक कोंडीने उत्पादनावर परीणाम, 4 हजार कामगारांच्या रोजगारावर संकट

अमित शाह पवारांच्या घरी; रेवती सुळेंच्या रिसेप्शन सोहळ्याला लावली उपस्थिती, पाहा व्हिडिओ

SCROLL FOR NEXT