Leaf water for constipation: पोट साफ होत नाहीये, आतड्यांमध्ये घाण साचलीये? सकाळी उठल्यावर फक्त या 1 पानाचं पाणी प्या!

Surabhi Jayashree Jagdish

बद्धकोष्ठता

बद्धकोष्ठतेचा त्रास अनेकदा आहार आणि दैनंदिन सवयींशी संबंधित असतो. आहारात तंतुमय पदार्थ कमी असणे, पुरेसे पाणी न पिणे, शारीरिक हालचाल कमी असणे किंवा जेवणाच्या वेळा अनियमित असणे यामुळे मल कठीण होऊन शौचास साफ होण्यास अडचण येऊ शकते.

betel leaf water for constipation | saam tv

घरगुती उपाय

बद्धकोष्ठता झाल्यानंतर अनेकजण सुरुवातीला घरगुती उपाय करून पाहतात. यामध्ये आहारात बदल करण्यासोबतच काही वनस्पती आणि नैसर्गिक घटकांचा वापर केला जातो.

betel leaf for constipation | saam tv

नागवेलीच्या पानाचं पाणी

बद्धकोष्ठतेसाठी नागवेलीच्या पानाचा वापर करण्याचीही पद्धत आहे. यासाठी काही नागवेलीची पानं बारीक करून रात्री पाण्यात भिजत ठेवली जातात आणि सकाळी हे पाणी गाळून रिकाम्या पोटी प्यावं. तर ही पानं पाण्यात उकळून ते पाणी काही प्रमाणात आटवून, गाळून कोमट असताना घेण्याची पद्धतही वापरली जाते.

betel leaf benefits for digestion | saam tv

निश्चित उपचार आहे का?

नागवेलीच्या पानाचं पाणी घेतल्याने बद्धकोष्ठता निश्चितपणे दूर होते असं नाही. बद्धकोष्ठतेवर उपचार करताना त्यामागील कारण समजून घेणं महत्त्वाचे असतं आणि त्यानुसार उपचार केले जातात.

betel leaf water in the morning | saam tv

आम्लपित्त

जेवल्यानंतर छातीत जळजळ, आंबट ढेकर येणे किंवा पोटात अस्वस्थता जाणवणं ही आम्लपित्ताची लक्षणं असू शकतात. अशा तक्रारींमध्ये साधं नागवेलीचं पान चावून खाल्लं जातं.

betel leaf for acidity | saam tv

हे नेमके कोणतं पान आहे?

या उपायात वापरलं जाणारं नागवेलीचे पान ज्याला विड्याचे पान किंवा Betel Leaf असंही म्हटलं जातं. भारतीय संस्कृतीत नागवेलीच्या पानाला विशेष महत्त्व असून पूजा आणि धार्मिक विधींमध्ये त्याचा वापर केला जातो.

traditional remedies for constipation | saam tv

खासियत

नागवेलीच्या पानामध्ये विविध वनस्पतिजन्य घटक आढळतात आणि त्याचा वापर पारंपरिक पद्धतीने पचनाशी संबंधित तक्रारींसाठी केला जातो. नागवेलीचे पान बद्धकोष्ठता किंवा आम्लपित्तावर प्रभावी उपचार ठरते, असे ठोस वैद्यकीय पुरावे नाहीत.

betel leaf water for digestion | saam tv

टीप

ही माहिती विविध सार्वजनिक स्रोतांवर आधारित असून केवळ सामान्य माहितीसाठी देण्यात आली आहे. या माहितीची स्वतंत्र वैद्यकीय पडताळणी आम्ही केलेली नाही. कोणतीही लक्षणे आढळल्यास स्वतः निष्कर्ष काढण्याऐवजी तज्ज्ञ डॉक्टरांचा सल्ला घ्या.

constipation treatment options | saam tv

Castor oil belly button: रात्री झोपताना नाभीमध्ये लावा एरंडेल तेल; हे 7 चमत्कारिक फायदे मिळतील

Castor oil belly button | saam tv
येथे क्लिक करा