Fire engulfs truck on Khambatki Ghat; fire brigade and police rush to the scene as traffic stalls on the highway. Saam Tv
Video

Satara News: थरारक! साताऱ्यातील खंबाटकी घाटात ट्रकचा जळून कोळसा; वाहतूक ठप्प, VIDEO

Satara-Pune Highway: सातारा-पुणे महामार्गावरील खांबटकी घाटात ट्रकला भीषण आग लागली. संपूर्ण ट्रक जळून खाक. जीवितहानी नाही. वाहतूक विस्कळीत. अग्निशमन व पोलीस घटनास्थळी दाखल होऊन नियंत्रणाचे प्रयत्न सुरू आहे.

Omkar Sonawane

सातारा-पुणे राष्ट्रीय महामार्गावरील खांबटकी घाटात आज दुपारी एक ट्रक अचानकपणे पेटल्याने मोठी खळबळ उडाली. मुराद भैरवनाथ मंदिराच्या पुढे घाटातील वळणावर ट्रकने अचानक पेट घेतला आणि काही क्षणात संपूर्ण ट्रक जळून खाक झाला. घटनेमुळे महामार्गावरील वाहतूक पूर्णतः विस्कळीत झाली असून वाहनांच्या रांगा लागल्या आहेत. सुदैवाने या आगीत कोणतीही जीवितहानी झाल्याचे वृत्त नाही. आग लागल्याचे कारण अद्याप स्पष्ट झालेले नसून अग्निशमन दलाच्या गाड्या घटनास्थळी दाखल होऊन आगीवर नियंत्रण मिळवण्याचे प्रयत्न सुरू आहेत. स्थानिक पोलीस आणि प्रशासन घटनास्थळी उपस्थित असून वाहतूक सुरळीत करण्याचे प्रयत्न सुरू आहेत.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Heavy Rain : मुसळधार पाऊस; वारणा धरणातून मोठ्या प्रमाणात विसर्ग, कृष्णेच्या पाणी पातळीत वाढ

Kumbh Rashi : कुंभ राशीचा आजचा रविवार जाणार कसा? वाचा स्पेशल राशीभविष्य

Rohini Khadse: कोण आहे रोहिणी खडसे? जाणून घ्या त्यांच्याविषयी

Maharashtra Live News Update: स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांमध्ये कार्यकर्त्यांची इच्छा - नितेश राणे

7 minutes after death: मृत्यूनंतर 7 मिनिटांत काय घडतं? पाहा वैज्ञानिक दृष्टीकोनातून समोर आलेल्या धक्कादायक गोष्टी

SCROLL FOR NEXT