NDRF and local teams conduct a search operation after a 15-year-old boy drowned during Sant Tukaram Maharaj’s Nira Snan in Indapur. Saam TV News
Video

Tukaram Nira Snan : आजीसोबत वारीत आलेला गोविंद वाहून गेला, नीरा स्नानवेळी दु:खद घटना

Tukaram Maharaj Palkhi: तुकाराम महाराज पालखी सोहळ्यात नीरा स्नानवेळी मोठी दुर्घटना घडली. जालना जिल्ह्यातील १५ वर्षीय गोविंद फोके नीरा नदीत वाहून गेला. एनडीआरएफ आणि अग्निशमन दल त्याचा शोध घेत आहेत. पालखीवर दु:खाचा डोंगर कोसळला.

Namdeo Kumbhar

Tukaram Maharaj Palkhi: जगद्गुरु संत श्रेष्ठ तुकाराम महाराजांचा पालखी सोहळा आज पुणे जिल्ह्यातील इंदापूर तालुक्यातील सराटी गावातील शेवटचा मुक्काम आटोपून नीरा नदीमध्ये पादुकांना पवित्र स्नान घालण्यात आले. पण यावेळी एका दु:खद घटना घडली.

संत तुकाराम पालखी सोहळ्यात आज सकाळी नीरा नदीत आंघोळीसाठी गेलेला मुलगा वाहून गेला. यामुळे तुकाराम महाराज यांच्या पालखी सोहळ्यावर दुखाचा डोंगर कोसळला.

गोविंद फोके असं वाहून गेलेल्या चिमुकल्याचे नाव आहे. तो १५ वर्षाचा आहे. आजी सोबत पंढरीच्या वारीसाठी १५ वर्षांचा गोविंद आला होता. नीरा नदीत पाण्याच्या भोवऱ्यात अडकल्याने तो वाहून गेला. जालना जिल्ह्यातील अंबड तालुक्यातील जिरपी गावातील तो होता. एका होमगार्ड त्याला वाचवण्याचा प्रयत्न केला मात्र तो वाहून गेला. आता एन डी आर एफ आणि अग्निशमन पोलिस मुलाचा तपास करत आहेत.

सोमवारी ३० जूनला इंदापूर तालुक्यातील सराटी गावात पालखी मुक्कामी विसावला होता. आज मंगळवारी १ जुलै रोजी सकाळी ७ वाजून १० मिनिटांनी देहू संस्थांच्या वतीने व स्थानिक प्रमुख ग्रामस्थ, मान्यवरांच्या हस्ते नीरा नदी पात्रात पादुकांना शाही स्नान घालण्यात आले.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Kiwi Benefits: थंडीत किवी खाल्ल्याने होतील 'हे' आरोग्यदायी फायदे

३ सीनिअर अधिकारी, २० पोलीस अन् गाड्यांचा ताफा; माणिकराव कोकाटेंच्या अटकेसाठी मुंबईकडे मोठा फौजफाटा | VIDEO

Success Story : वडिलांचं छत्र हरपलं, मजुरी करणाऱ्या आईचं पाठबळ; आता घेतलीय वैश्विक भरारी, गोल्डन गर्ल श्वेताची प्रेरणादायी झेप

Mumbai Traffic Alert: मुंबईच्या पश्चिम द्रुतगती महामार्गावर दीड तासापासून वाहतूक कोंडी|Video Viral

Maharashtra Live News Update: गेवराई शहरातील महाविद्यालयीन तरूणी अपहरण प्रकरणात पोलिसांना यश

SCROLL FOR NEXT