Gondia Tractor Washed Away  Saam TV
Video

VIDEO : पुराच्या पाण्यात ट्रॅक्टरसह चालक गेला वाहून, थरारक घटना मोबाइल कॅमेऱ्यात कैद

Gondia Tractor Washed Away : बाघनदीच्या पुरात ट्रॅक्टर वाहून गेल्याची घटना घडली. सुदैवाने ट्रॅक्टरचालक कृष्णा मारोती वल्थरे (वय ३० रा पद्मपुर) पुराच्या पाण्यातून वाचला आहे.

Satish Daud

मागील दोन ते तीन दिवसांपासून विदर्भात अतिमुसळधार पाऊस पडत आहेत. पावसामुळे नद्या-नाल्यांना पूर आला असून अनेक ठिकाणी पूरस्थिती निर्माण झाली आहे. गोंदिया जिल्ह्यातील देवरी तालुक्यातील बाघनदीला देखील पूर आलाय. त्यामुळे शिलापूर- पुराडा मार्गावरील पूल पाण्याखाली गेलाय. अशातच बाघनदीच्या पुरात ट्रॅक्टर वाहून गेल्याची घटना घडली.

सुदैवाने ट्रॅक्टरचालक कृष्णा मारोती वल्थरे (वय ३० रा पद्मपुर) पुराच्या पाण्यातून वाचला आहे. ही थरारक घटना मोबाइल कॅमेऱ्या कैद झाली आहे. मिळालेल्या माहितीनुसार, शेतीच्या कामासाठी सदर ट्रैक्टर रोजंदारीच्या महिलांना सोडायला गेला होता. पुलावरुन पुराचे पाणी जात असतांना सुद्धा चालकाने अती आत्मविश्वासाने पुराच्या पाण्यात ट्रॅक्टर नेले.

शिरपूरच्या मनोहर सागर धरणाचे वक्र दरवाजे उघडण्यात आल्यामुळे पाण्याच्या पातळीत वाढ झाली होती. यामध्ये ट्रॅक्टर वाहून गेले. विशेष म्हणजे देवरी पोलीस स्टेशन चे कर्तव्यदक्ष पोलीस निरीक्षक प्रवीण डांगे यांनी तालुक्यातील पूर परिस्थितीची पाहणी केली होती. सदर घटनास्थळी अनेक वर्षापासून पुलाची मागणी केली जात असून लोकप्रतिनिधी याकडे सर्रास दुर्लक्ष करीत असल्याचे परिसरातील लोकांचे म्हणणे आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Garba Bindi Designs : गरब्यात सगळ्यांची नजर फक्त तुमच्यावरच! ट्राय करा 'या' ७ ट्रेंडी बिंदी डिझाइन्स

Maharashtra News Live Update: लंडनमध्ये युवराज खोपडे यांचा कुस्तीचा डंका

Heart Attack Symptoms: हार्ट अटॅकआधी शरीर देतं हे ७ संकेत, जाणून घ्या

Gold Rate Today: महिन्याच्या पहिल्या दिवशी सोनं झालं स्वस्त, १० तोळा ३३०० रुपयांनी घसरले; वाचा 18k- 22k आणि 18k चे दर

किचनमध्ये रोज होणाऱ्या ७ चुका, ज्या प्रत्येक महिलेने आवर्जून टाळाव्यात; आरोग्यावर होतात गंभीर परिणाम

SCROLL FOR NEXT