amboli news  saam tv
Video

Amboli Waterfall: आंबोली धबधब्याच्या सौंदर्याला पर्यटकांचे आकर्षण,पाहा व्हिडिओ

Amboli Ghat Turns Into Weekend Getaway: सिंधुदुर्ग जिल्ह्यात गेल्या काही दिवसात पावसाने दडी मारली असली तरी आंबोलीच्या धबधब्यावर मात्र पर्यटकांची मोठी गर्दी पाहायला मिळते आहे.

Omkar Sonawane

विनायक वंजारे, साम टीव्ही

सिंधदुर्ग: गेल्या काही दिवसांपासून सिंधुदुर्ग जिल्ह्यात पावसाने फारशी हजेरी लावलेली नसली, तरी आंबोली घाटात मात्र निसर्गप्रेमी पर्यटकांची मोठी गर्दी पाहायला मिळत आहे.आज शनिवार असल्याने आज आंबोलीच्या प्रसिद्ध धबधब्याला भेट देणाऱ्यांची संख्या लक्षणीय वाढलेली दिसून आली.धबधब्याच्या सान्निध्यात आल्हाददायक वातावरणात भिजण्याचा, फोटो काढण्याचा आणि थंडगार हवेत वेळ घालवण्याचा आनंद पर्यटक लुटत आहेत. काही दिवसांपूर्वी झालेल्या थोडक्या पावसामुळे धबधबा सळसळून वाहत आहे, त्यामुळे त्याचे सौंदर्य अधिकच खुलले आहे.

स्थानिक प्रशासनाने पर्यटकांनी सुरक्षित अंतर राखावे, धोकादायक ठिकाणी जाणे टाळावे अशा सूचना केल्या असून, काही ठिकाणी सुरक्षारक्षकही तैनात करण्यात आले आहेत.एकूणच, निसर्गाच्या कुशीत एक आठवड्याचा थकवा विसरून आराम करण्यासाठी आंबोली पुन्हा एकदा पर्यटकांचे आवडते ठिकाण ठरत आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra News Live Update: मराठा आंदोलक मनोज जरांगे पाटील यांची तब्येत पुन्हा बिघडली

Wednesday Horoscope : 6 राशींची होणार चांदी, काहींना डोकं शांत ठेवण्याची गरज; वाचा बुधवारचे राशीभविष्य

Metro 13 Update : मुंबई मेट्रो आता वसई-विरारपर्यंत धावणार; १७,७२४.९९ कोटी खर्च, २५.०३ किमी लांबी, १६ स्थानके, प्रवासाचा वेळ अर्ध्यावर

सरकारी कर्मचाऱ्यांसाठी खूशखबर! महागाई भत्त्यात वाढ, फडणवीस सरकारचा निर्णय; या तारखेपासून लागू

Pune Waterfall : जंगलाच्या कुशीत लपलेला सुंदर धबधबा! पुण्यापासून अवघ्या काही अंतरावर वसलंय 'हे' ठिकाण

SCROLL FOR NEXT