Barvi Hills: हिरवीगार झाडी अन् सुंदर धबधबा! बदलापूरपासून अगदी हाकेच्या अंतरावर असलेल्या 'या' ठिकाणाला नक्की भेट द्या

Dhanshri Shintre

बारवी धरण

महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळ निर्मित बारवी धरण १९६३च्या सुमारास बांधण्यात आले.

पाणी पुरवठा

ठाणे जिल्ह्यातल्या औद्योगिक वसाहतींना पाणी पुरवण्याच्या हेतूने याची निर्मिती करण्यात आली.

धबधबा

पावसाळ्यात मुसळधार पावसात भिजण्याची आणि धरण भरून वाहताना धबधबा पाहण्याची आणखी वेगळी मजा असते.

कधी जावे?

शनिवार, रविवार, तसेच सार्वजनिक सुट्टीच्या दिवशी बहुसंख्य पर्यटक येतात.

कसे जाता येईल?

बदलापूर स्थानकात उतरून मुरबाडच्या दिशेने साधारण १४ किलोमीटर अंतरावर हे धरण आहे.

विशेष सूचना

रात्री १० नंतर सार्वजनिक वाहतुकीची सोय नाही. रात्री निवासाची सुविधा उपलब्ध नाही.

जेवणाची सोय

बदलापूर येथे निवासाची आणि जेवणाची सोय होऊ शकते.

घनदाट जंगल

बारवी धरणातील अथांग पाणी, बाजूला घनदाट जंगल, वनराई यामुळे हे दृश्य डोळ्यांत साठवून ठेवावे असेच असते.

ट्रेकिंगची आवड

ट्रेकिंगची आवड असणाऱ्यांसाठी हा उत्तम पर्याय आहे. कुटुंबीयांसमवेत एक दिवसाची चांगली सहल होऊ शकते.

NEXT: निसर्गरम्य कोकण! कणकवलीतील ‘सावडाव धबधब्यावर’ पर्यटकांची गर्दी, तुम्ही पण एकदा नक्की भेट द्या

येथे क्लिक करा