Savdav Waterfall: निसर्गरम्य कोकण! कणकवलीतील ‘सावडाव धबधब्यावर’ पर्यटकांची गर्दी, तुम्ही पण एकदा नक्की भेट द्या

Dhanshri Shintre

सावडाव धबधबा

मान्सून वेळेआधीच कोकणात दाखल झाल्यामुळे कणकवलीतील प्रसिद्ध असलेला सावडावचा धबधबा ही पुर्ण क्षमतेने प्रवाहित झाला आहे.

निसर्गरम्य धबधबा

सावडाव धबधबा हा सिंधुदुर्गातील एक निवांत आणि निसर्गरम्य धबधबा असून यावर्षी पाऊस वेळेआधी सुरु झाल्याने हा धबधबा प्रवाहित झाला आहे.

पर्यटक

त्यामुळे सर्वात सुरक्षित असणाऱ्या या धबधब्याचा आनंद लुटण्यासाठी पर्यटक मोठ्यासंख्येने दाखल होत आहेत.

उंची किती?

सह्याद्रीच्या घनदाट डोंगररांगांमधून कोसळणारा हा धबधबा 60-70 फूट रुंद, तर सुमारे 30 फूट उंच आहे.

मुंबईपासून किती अंतर?

मुंबई-गोवा महामार्गापासून सुमारे सहा किलोमीटर अंतरावर हा निसर्गरम्य धबधबा सहज पाहायला मिळतो.

कणकवलीपासून किती अंतर?

कणकवलीपासून अवघ्या १६ किलोमीटर अंतरावर असलेला हा धबधबा पर्यटकांसाठी एक आकर्षक ठिकाण ठरतो.

पार्किंग शुल्क

दरवर्षीच्या वाहतूक कोंडीला आळा घालण्यासाठी ग्रामपंचायतीने येथे पार्किंग शुल्क घेण्याची प्रक्रिया सुरू केली आहे.

NEXT: पावसाळी सहलीसाठी निसर्गरम्य आणि थंड हवामान असलेले ८ सुंदर पर्यटनस्थळं

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

येथे क्लिक करा