Rainy Season Travel: पावसाळी सहलीसाठी निसर्गरम्य आणि थंड हवामान असलेले ८ सुंदर पर्यटनस्थळं

Dhanshri Shintre

निसर्गाच्या सान्निध्यात सहल

पश्चिम घाटातील हिरव्यागार निसर्गाच्या सान्निध्यात सहल करण्याची योजना असेल, तर ही दहा सुंदर ठिकाणं तुमच्या यादीत अवश्य समाविष्ट करा.

निसर्गसंपन्न ठिकाण

नद्या, डोंगर, धबधबे आणि घनदाट जंगलामुळे पश्चिम घाट पर्यटकांना आकर्षित करणारे एक निसर्गसंपन्न ठिकाण ठरते.

महाबळेश्वर

हे ठिकाण मराठी कुटुंबांसाठी ओळखीचं असलं तरी पावसाळ्यातील त्याचं सौंदर्य अनुभवणं खरंच खास ठरतं.

उटी

थंड हवामान, चहाचे मळे, तलाव आणि बोटॅनिकल गार्डनसह निवांत अनुभव घेण्यासाठी उटी हे उत्तम ठिकाण आहे.

मोल्लेम

भारताचा सर्वात उंच आणि दुधाळ दूधसागर धबधबा येथे आहे, आणि स्थानिक खाद्यसंस्कृतीही अत्यंत रुचकर आहे.

कूर्ग

भारताचं स्कॉटलँड म्हणून ओळखलं जाणारं कूर्ग, निसर्ग, धबधबे आणि कॉफीच्या खमंग सुवासाने मन मोहून टाकतं.

मुन्नार

हिरवळीत न्हालेलं, चहाच्या मळ्यांनी सजलेलं मुन्नार हे फोटोग्राफी आणि शांततेसाठी सर्वोत्तम ठिकाण मानलं जातं.

वालपराई

चहा व कॉफीच्या मळ्यांसाठी प्रसिद्ध असलेलं हे ठिकाण, सूर्योदय-सूर्यास्त पाहण्यासाठी पर्यटकांचं आवडतं ठिकाण ठरतं.

वायनाड

जंगल, नद्या, धबधबे, गुहा आणि हृदयाकृती तलाव व बोटिंगसाठी हे केरळमधील हिल स्टेशन प्रसिद्ध आहे.

कोडाईकॅनल

शांत तलाव, उंच कड्यांवरून पडणारे धबधबे आणि हिरवळ भरलेल्या परिसरामुळे पिकनिकसाठी हा जागा अतिशय योग्य आहे.

NEXT: पावसात ट्रेकिंगसाठी शोधताय खास ठिकाणं? मग 'या' ६ गडकिल्ल्यांना नक्की भेट द्या

येथे क्लिक करा