Brain-Eating Amoeba Saam TV
Video

Brain-Eating Amoeba Kerala News : केरळमध्ये मेंदू खाणारा अमिबा, तीन मुलांचा मृत्यू

केरळमध्ये मेंदू खाणारा अमिबा एका मुलाच्या मेंदूत शिरला आहे. केरळमधली ही चौथी घटना असून यात तीन मुलांचा मृत्यू झाला आहे.

Tushar Ovhal

केरळमध्ये मेंदू खाणाऱ्या अमिबाची दहशत पसरली आहे. या अमिबाची लागण चार मुलांना झाली असून आतापर्यंत तीन लहानग्यांचा मृत्यू झाला आहे. उत्तर केरळमधील पायोली इथे राहणारा १४ वर्षाचा मुलगा तलावात पोहायला गेला होता. तेव्हा हा अमिबा त्याचा संपर्कात आला. नाकावाटे हा अमिबा या मुलाच्या मेंदूत शिरला. त्यामुळे या मुलाची तब्येत बिघडली. केरळमधली ही चौथी घटना आहे. आधीच्या तीन घटनांमध्ये अशाचप्रकारे ही मुलं पाण्यात पोहण्यासाठी गेले होते. तेव्हा नाकावटे हा अमिबा त्यांच्या मेंदूत शिरला. उपचारादरम्यान या तीनही मुलांचा मृत्यू झाला. चौथ्या मुलावर सध्या उपचार सुरू आहेत. विदेशी औषध दिल्यानंतर त्याच्या प्रकृतीत सुधारणा होत असल्याचे डॉक्टरांनी सांगितले आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

भिकाऱ्याला मिळणार 10 हजार रुपये? सरकारची भिकाऱ्यांसाठी नवी योजना?

Pune Politics: "मूळ पुणेकरांचा" कौल कोणाला! पुण्यातील शनिवार, नारायण पेठांवर भाजप वर्चस्व राखणार?

Maharashtra Live News Update: नाशिकमध्ये आलेल्या मंत्री उदय सामंत यांच्या बॅगची तपासणी

Dominos style pizza: घरच्या घरी बनवा डॉमिनोजसारखा पिझ्झा, पाहा रेसिपी

शिंदेंच्या बालेकिल्ल्यात राज ठाकरेंचा रोडशो, ठाणेकरांना काय आवाहन करणार? पाहा व्हिडिओ

SCROLL FOR NEXT