ZP School  Saam TV
Video

ZP School Teacher Transfer : जिल्हा परिषद शाळांमधील 253 शिक्षकांच्या बदल्या | VIDEO

Online Teacher Transfer : शेकडो शिक्षकांच्या पुन्हा बदल्या होणार आहेत. जिल्हा परिषद शाळांमधील शिक्षकांच्या ऑनलाईन बदली प्रक्रिया सध्या सुरू आहे.

ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई

जिल्हा परिषद शाळांमधील शिक्षकांच्या ऑनलाईन बदल्या प्रक्रियेला गती मिळाली असून, ठाणे जिल्हा परिषदेच्या संवर्ग-एकमधील २५३ शिक्षकांच्या बदल्या जाहीर करण्यात आल्या आहेत. राज्य शासनाच्या ग्रामविकास विभागाच्या अधिपत्याखाली ही प्रक्रिया राबवली जात आहे.

बदल्यांमुळे शिक्षकांची नियुक्ती गरजेनुसार विविध शाळांमध्ये करण्यात येणार असून, ग्रामीण व दुर्गम भागातील शाळांना शिक्षकांची गरज पूर्ण होणार आहे. या बदल्यांमुळे शैक्षणिक दर्जा उंचावण्यास मदत होणार असल्याची अपेक्षा व्यक्त केली जात आहे. बदल्यांची संपूर्ण प्रक्रिया ऑनलाईन पद्धतीने पारदर्शक व निःपक्षपातीपणे राबवण्यात येत आहे. ऑनलाईन पद्धतीने पारदर्शकपणे बदल्या करण्यात येत असल्यामुळे शिक्षकांमध्ये समाधान व्यक्त होत आहे. प्रशासनाच्या अधिकृत संकेतस्थळावर बदली आदेश पाहता येणार आहेत.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

शिंदेसेनेनंतर भाजप नगरसेवकाची गुंडगिरी, महाडच्या मुख्याधिकाऱ्यांना छत्रीनं मारहाण, अटकेचा फार्स आणि कायद्याचे धिंडवडे

Shahi Tukda Recipe: गोड खाण्याची इच्छा होते? मग झटपट घरच्या घरी बनवा स्वादिष्ट शाही तुकडा

Maharashtra News Live Update: खेडमध्ये अतिवृष्टीचा हाहाकार; तिघांचा मृत्यू, एक जण बेपत्ता

Sanju Samson : भारत-इंग्लंड मालिकेदरम्यान संजू सॅमसनचा मोठा निर्णय; अचानक स्पर्धेतून नाव घेतलं मागे; सर्वांनाच आश्चर्याचा धक्का

भीषण अपघात! कार दरीत कोसळली, वाहन बाहेर काढताच आतमध्ये असलेलं घबाड पाहून पोलीसही चक्रावले

SCROLL FOR NEXT