Thane Scool News Today Saam TV News
Video

Thane: आधी फी मगच शाळा? ठाण्याच्या पोलिस स्कूलमधील धक्कादायक प्रकार, 100 विद्यार्थ्यांना बाहेर काढल्यानं संताप

Thane Scool News Today: फी न भरल्याचा ठपका ठेवत 100 विद्यार्थ्यांच्या पालकांना फोन करुन मुलांना घरी घेऊन जायला सांगितलं? ठाण्यात नेमकं काय घडलं? पालक का संतापले?

Saam TV News

ठाणे : फी न भरल्यानं शाळेच्या विद्यार्थ्यांना बाहेर काढण्याचा धक्कादायक प्रकार ठाण्यातून समोर आला आहे. दरम्यान, फी भरण्यासाठी दोन दिवस बाकी असतानाही शाळेच्या व्यवस्थापनानं केलेल्या कृतीवर पालकांनी संपात व्यक्त केला आहे. ठाणे पोलिस स्कूलमध्ये हा सगळा प्रकार घडलाय. जवळपास 100 विद्यार्थी यामध्ये भरडले गेलेत. शाळेने दिलेल्या फी भरण्याच्या ॲप मध्ये 12 तारीख शेवटची होती. असं असतानाही शाळेच्या पहिल्याच दिवशी विद्यार्थ्यांना बाहेर काढण्यात आलं. दरम्यान सकाळी विद्यार्थी शाळेत आल्यानंतर थोड्याच वेळात पालकांना शाळेतून फोन गेले आणि तुमच्या पाल्यांची फी भरली नसल्याने तुम्ही त्यांना घेऊन जा, असा निरोप शाळेकडून देण्यात आला. यामुळे पालकांनी शाळेभोवती गराडा घातला. तरी देखील शाळेच्या मुख्याध्यापिका तसेच व्यवस्थापकांनी यावर कोणतेही भाष्य केले नाही.. या घटनेनंतर युवा सेना सचिव पूर्वेश सरनाईक यांनी शाळेच्या मुख्याध्यापक यांच्याकडे विचारणा केली. मात्र त्यांनी जबाबदारी झटकली असल्याचं सांगितलं जातंय. दरम्यान, या बाबत शिक्षणमंत्री दीपक केसरकर यांच्याकडे तक्रार करणार असल्याचंही सांगितलं जातंय.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

बीडमध्ये अमरावती पॅटर्न, अल्पवयीन मुलीवर अत्याचार; नराधमाकडून अश्लील व्हिडिओ बनवून धर्मांतरासाठी दबाव

Accident : लग्नाच्या वऱ्हाडावर काळाचा घाला; नववधूसह तिघांचा मृत्यू, भीषण अपघातानंतर महामार्गावर रक्ताचा सडा

Afzal Khan history: अफजल खानाने त्याच्या ६३ पत्नींची हत्या का केली होती?

Maharashtra News Live Update: लातूरच्या आणखी एका शेतकऱ्याचा उष्माघाताने मृत्यू

Accident News : प्रवाशांनी भरलेल्या बसचा भीषण अपघात, ४ जणांचा मृत्यू; १२ गंभीर जखमी

SCROLL FOR NEXT