Eknath Shinde SaamTv
Video

Eknath Shinde : एकनाथ शिंदेंच्या हाती 'मशाल', पाहा Video

Eknath Shinde News : राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आज ठाण्यात मशाल हाती घेतली. विशेष म्हणजे ही मशाल त्यांच्याच कार्यकर्त्यांनी शिंदेच्या हाती दिली आहे.

Saam Tv

राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आज मशाल हाती घेतली. विशेष म्हणजे ही मशाल त्यांच्याच कार्यकर्त्यांनी शिंदेच्या हाती दिली आहे. आज ठाणे जिल्ह्याचे शिवसेनेचे दिवंगत जिल्हा प्रमुख आनंद दिघे यांची जयंती आहे. जिल्ह्यातून शिवसैनिक या ठिकाणी दर्शनासाठी येत आहेत. शिवसेनेचे दिवंगत नेते आनंद दिघे यांचं ठाण्यातील शक्ती स्थळ या ठिकाणी मुंबईमधील शिवडी या ठिकाणाहून आलेल्या दिघे प्रेमींनी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना पेटती मशाल दिली. तसेच शिंदे यांचे आभार मानले. त्यामुळे एकनाथ शिंदे यांनी मशाल हाती घेतल्याची चर्चा मात्र आता चांगलीच रंगली आहे.

पक्ष फुटीच्या राजकरणांतर उद्धव ठाकरे आणि एकनाथ शिंदे असे शिवसेनेचे दोन गट पडले आहेत. यात धनुष्यबाण असलेलं शिवसेनेचं पारंपरिक चिन्ह हे शिंदे यांच्याकडे गेलं आहे. तर मशाल हे उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेचं चिन्ह आहे. त्यामुळे आज आनंद दिघे यांच्या जयंतीनिमित्त ठाण्याच्या आनंद आश्रमात आलेल्या शिवसनेच्या कार्यकर्त्यांनी एकनाथ शिंदे यांच्या हातात पेटती मशाल दिल्यावर याची चर्चा आता होत आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra Politics : 'पंढरीच्या वारीत अर्बन नक्षली'; सत्ताधारी महिला आमदाराचा सभागृहात खळबळजनक दावा

Maharashtra Live News Update: पुण्यात शॉक सर्किटमुळे चारचाकी गाडी जळून खाक; कोणतीही जीवितहानी नाही

Fact Check : अमरावतीच्या छत्री तलावाजवळ भूत? युवकाला बेदम चोपला, वाढदिवसाच्या पार्टीत नेमकं काय घडलं?

Nandurbar News: अंत्यसंस्कारासाठी जीवघेणा प्रवास, आदिवासींच्या यातना संपेना|VIDEO

Mobile Recharge : 400 रुपयांमध्ये 400GB डेटा, धमाकेदार ऑफर

SCROLL FOR NEXT