उद्धव ठाकरे Saam tv
Video

ठाकरेसेनेकडून भाजपचा पराभव, सय्यद इक्बाल परभणीचे महापौर, काँग्रेसची निर्णायक भूमिका

Parbhani Municipal Corporation results : परभणी महानगरपालिकेत ठाकरे गटाचे सय्यद इक्बाल १३ मतांनी विजयी होत महापौर झाले. काँग्रेसच्या निर्णायक पाठिंब्यामुळे भाजपला पराभवाचा सामना करावा लागला. विरोधकांच्या एकीमुळे परभणीत सत्ता परिवर्तन घडले.

Namdeo Kumbhar

Parbhani Municipal Corporation mayor election results : परभणी महानगरपालिकेवर उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेने सत्ता स्थापन केली आहे. ठाकरे गटाचे सय्यद इक्बाल यांनी १३ मतांनी भाजपचा पराभव केला. सय्यद इक्बाल यांना ३९ मते मिळाली तर भाजपच्या तिरुमला खिल्लारे यांना २६ मतांवर समाधान मानावे लागले. जनसुराज्य ३, राष्ट्रवादी काँग्रेस ११ आणि भाजपची १२ मते ठाकरेंच्या विरोधात पडली. परभणीत काँग्रेसने ठाकरेंच्या उमेदवारांना पाठिंबा दिल्यामुळे भाजपचा पराभव झाला.

महापौरपदाच्या निवडणुकीत याआधी काँग्रेसच्या नगरसेवकाने उमेदवारी मागे घेत ठाकरेंच्या शिलेदारांना पाठिंबा दिला. चंद्रपूरमध्ये भाजपने बहुमत नसताना सत्ता स्थापन केली होती. त्यामुळे आता परभणीत काही चमत्कार करणार का? याची चर्चा सुरू होती. पण चंद्रपूरमधील चूक विरोधकांनी टाळत एकी दाखवली. परभणीत भाजपला १३ मतांनी पराभवाचा सामना करावा लागला.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

ऐन पावसाळ्यात मॅनहोलच्या कामांचा आदेश कुणाचा? मॅनहोलच्या निर्णयावरून अधिकाऱ्यांमध्येच मतभेद

बेपर्वा पालिका निष्पापांचे बळी, 6 जणांचे मारेकरी कोण?

'नागरिक सरकारचे गुलाम आहेत का?' 'पोलीस पंतप्रधान, मुख्यमंत्र्यांचे नव्हे जनतेचे सेवक'

'राम मंदिर पैशांचा वापर पक्षफोडीसाठी', उद्धव ठाकरेंचा भाजपवर मोठा आरोप, ठाकरेंचा भाजपविरोधात रामरक्षा आंदोलन

Akshay Kumar: अक्षय कुमारने विकले मुंबईतील दोन आलिशान फ्लॅट; १२ कोटींपेक्षा जास्त झाला फायदा

SCROLL FOR NEXT