beed news  saam tv
Video

Manikrao Kokate: मंत्री कोकाटेंच्या फोटोला जोडे मारत शेण फासलं|VIDEO

Manikrao Kokate controversial statement : बीड येथे ठाकरे गटाच्या कार्यकर्त्यांनी कृषि मंत्री माणिकराव कोकाटेंच्या फोटोला जोडे मारत शेण फासले आहे.

Omkar Sonawane

राज्यात काही दिवसापूर्वी पडलेल्या अवकाळी पावसाने शेतपिकांचे मोठी नुकसान झाले आहे. द्राक्ष,गहू, डाळिंब या पिकांचे विशेषतः मोठ्या प्रमाणात नुकसान होऊन बळीराजा हा हवालदिल झाला होता. मात्र नेहमी आपल्याच वादग्रस्त विधानाने चर्चेत असणारे माणिकराव कोकाटे यांनी शेतकऱ्यांच्या बांधावर जात त्यांनाच खडेबोल सुनावले.

सरकारने दिलेल्या पैशाची तुम्ही एक रुपयाची तरी गुंतवणूक करता का? त्या पैशांचे तुम्ही पोरांचे साखरपुडे आणि लग्न करता असे बोलून शेतकऱ्यांच्या जखमेवर मीठ चोळण्याचे काम या मंत्री महोदयांनी केले. यानंतर मंत्री कोकटेंवर टीकेचे झोड उठले. मंत्री कोकाटेंच्या निषेधार्थ आज बीडमध्ये ठाकरे गटाने आंदोलन करून त्यांच्या फोटोला जोडे मारत शेण फासले. शेतकरी हा जगाचा पोशिंदा आहे. अवकाळी पावसामुळे शेतीच्या पिकाला तडाखा गेला आहे आणि हे मंत्री असे विधान करत आहे त्यामुळे कोकाटे यांची मंत्रिमंडळातून तात्काळ हकालपट्टी करावी अशी मागणी बीड येथील ठाकरे गटाच्या कार्यकर्त्यांनी केली आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Shubman Gill: बाल बाल बचावला गिल; ब्रूकनं मारलेला चेंडू लागला थेट शुबमनच्या डोक्याला|Video Viral

Maharashtra Live News Update: पंतप्रधान नरेंद्र मोदी ऑर्डर ऑफ द रिपब्लिकने सन्मानित

Badlapur Firing : बदलापूर गोळीबार प्रकरणाला नवं वळण; गाळीबारामागे शिवसेना पदाधिकाऱ्याचा हात?

Eknath Shinde : 'जय गुजरात'च्या घोषणेनंतर एकनाथ शिंदेंचं स्पष्टीकरण, उद्धव ठाकरेंचा VIDEO दाखवत विरोधकांना प्रत्युत्तर

DR. MC Dawar Death : आधी २ रुपये, आता २० रुपयांमध्ये करायचे उपचार; गरीबांचे डॉक्टर पद्मश्री एमली डावर काळाच्या पडद्याआड

SCROLL FOR NEXT