Kantara Chapter 1: 'हा चित्रपट आणि पात्र...'; ऋषभ शेट्टीने सांगितलं 'या' कारणामुळे 'कांतारा' ब्लॉकबस्टर होऊ शकला

Kantara Chapter 1 : 'कांतारा: अ लेजेंड चॅप्टर १' हा चित्रपट प्रदर्शित झाल्यापासून केवळ बॉक्स ऑफिसवरच नाही तर प्रेक्षकांच्या मनावरही राज्य करत आहे. लवकरत हा चित्रपट ५०० कोटींची कमाई करेल अशी अपेक्षा आहे.
Kantara Chapter 1 Box Office Collection Day 7
Kantara Chapter 1 CollectionSAAM TV
Published On

Kantara Chapter 1: 'कांतारा: अ लेजेंड चॅप्टर १' हा चित्रपट प्रदर्शित झाल्यापासून केवळ बॉक्स ऑफिसवरच नाही तर प्रेक्षकांच्या मनावरही राज्य करत आहे. या चित्रपटाने अवघ्या एका आठवड्यातच अभूतपूर्व व्यवसाय केला आहे आणि हा ट्रेंड असाचं सुरु आहे.

कांतारा: चॅप्टर १ ला 'कांतारा' पेक्षाही जास्त प्रेम मिळत आहे. हा चित्रपट २०२२ च्या रिलीज झालेल्या 'कांतारा'चा प्रीक्वल आहे आणि प्रत्येक दृश्य इतका शक्तिशाली आहे की लोक त्याची सतत प्रशंसा करत आहेत. कथा, पात्रे आणि व्हीएफएक्स मोठ्या पडद्यावर उत्तम प्रकारे सादर केली गेली आहेत. म्हणूनच हा चित्रपट यशाच्या मार्गावर आहे.

Kantara Chapter 1 Box Office Collection Day 7
Deepika Padukone: 'एवढ्या प्रेमाने भारताला प्रमोट केलं असतं...'; हिजाब परिधान केल्यामुळे दीपिका पदुकोण ट्रोल,नेमकं प्रकरण काय?

कांतारा: चॅप्टर १ च्या यशाचे रहस्य

कांतारा: चॅप्टर १ ने त्याचे बजेट वसूल केले आहे आणि आता तो आणखी प्रोफिट कमावत आहे. अभिनेता आणि दिग्दर्शक ऋषभ शेट्टी यांनी एका कार्यक्रमात 'कांतारा: चॅप्टर १' च्या यशाचे रहस्य उलगडले. तो म्हणाला, "मागील भागापासून ते या भागापर्यंत, आम्ही चित्रपटाचा विस्तार केला आहे. मी आधी सांगितले आहे की आपण जितके मातीशी जोडलेले असू तितके आपली प्रगती अधिक होणार आणि नेमके तेच घडले."

Kantara Chapter 1 Box Office Collection Day 7
Sunny Deol Film: सनी देओल त्याच्यापेक्षा ३३ वर्षांनी लहान अभिनेत्रीसोबत करणार रोमान्स; नव्या चित्रपटातील खास सीन लीक

कांतारा चॅप्टर १ च्या सक्सेस पार्टीमध्ये, ऋषभ शेट्टी म्हणाले, "हा चित्रपट आणि पात्र माझे स्वप्न होते, जे माझ्या टीमने स्वीकारले आणि आता ते प्रेक्षकांचे स्वप्न बनले आहे. माझी ऊर्जा आणि ताकद प्रेक्षकांनी आत्मसाद केली आहे."

कांतारा चॅप्टर १ बॉक्स ऑफिस कलेक्शन

कांतारा चॅप्टर १ बॉक्स ऑफिसवर चांगली कमाई करत आहे. अंदाजे ६१ कोटी सह सुरुवात करून, चित्रपटाने भारतात फक्त सात दिवसांत ३१६ कोटी रुपये कमावले आहेत. बुधवारी, आठवड्याच्या शेवटी चित्रपटाचा कलेक्शन २५ कोटी होता. आठवड्याच्या शेवटी हे कलेक्शन आणखी वाढण्याची अपेक्षा आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com