nashik news Saam Tv
Video

Nashik News: नाशिकमध्ये ठाकरे गट आणि मनसेच्या बैठकीत वादाची ठिणगी; माजी महापौर संतापून बैठकीतून बाहेर|VIDEO

War of Words in Shiv Sena: नाशिकमध्ये शिवसेना ठाकरे गटाच्या बैठकीत माजी महापौर विनायक पांडे आणि जिल्हा संपर्क प्रमुख जयंत दिंडे यांच्यात वाद चिघळला. वसंत गीते यांच्या पराभवावरून झालेल्या शाब्दिक बाचाबाचीमुळे पांडे बैठक सोडून गेले.

Omkar Sonawane

नाशिकमधील ठाकरे गटाच्या बैठकीत माजी महापौर पांडे आणि दिंडे यांच्यात तीव्र वाद झाला.

वसंत गीते यांच्या पराभवासाठी "MD ड्रग्स" विषयाचा प्रचारात अभाव हे कारण ठरले, असा आरोप.

पांडे यांनी बैठकीतून संतापाने बाहेर पडत समर्थकांसह बहिष्कार केला.

या वादामुळे ठाकरे गटाच्या स्थानिक संघटनेत तणावाचे वातावरण निर्माण झाले.

नाशिकच्या शिवसेना ठाकरे गटाच्या मध्यवर्ती कार्यालयामध्ये ठाकरे गटाच्या अंतर्गत बैठकीत माजी महापौर विनायक पांडे आणि ग्रामीण जिल्हा संपर्क प्रमुख जयंत दिंडे यांच्यात मोठा वाद झाला. विधानसभा निवडणुकीदरम्यान वसंत गीते उमेदवार असताना प्रचाराची दिशा आणि मुद्द्यांवरून दोघांमध्ये शाब्दिक बाचाबाची झाली.

बैठकीदरम्यान जयंत दिंडे यांनी "MD ड्रग्स" विषय लोकांपर्यंत नीट पोहोचला नाही, त्यामुळेच वसंत गीते यांचा पराभव झाला, असा आरोप केला. यावर तत्काळ प्रतिक्रिया देताना विनायक पांडे म्हणाले, तसं असतं तर गीते यांना एवढे मतदान मिळाले असते का?

या वक्तव्यांवरून दोघांमध्ये वाद चिघळला. आम्ही इतकी वर्ष पक्षात आहोत ते उगाच का? असा सवाल करत पांडे अचानक बैठक सोडून निघून गेले. त्यांच्या पाठोपाठ पांडे समर्थकांनीही बैठक बहिष्कृत केली.

या घडामोडींमुळे ठाकरे गटाच्या स्थानिक संघटनेत तणावाचे वातावरण निर्माण झाले आहे

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Beed Crime: कराड गँगची गुंडगिरी सुरूच;आधी पत्नीला मारहाण नंतर तरुणाला घासायला लावलं नाक, व्हिडिओ व्हायरल

Astro Tips For Money: पैशाच्या कमतरतेमुळे त्रस्त आहात? करा 'हे' उपाय, होईल भरभराट

Maharashtra Politics : काँग्रेसला मोठा धक्का बसणार, नाराज नेता शिंदेंच्या शिवसेनेच्या वाटेवर

Maharashtra Live News Update: गडचिरोली जिल्ह्यातील आरमोरी येथील इमारत कोसळली तीन जण जागीच ठार

Liver Infection: लिव्हर इन्फेक्शन झाल्यास शरीरात 'ही' लक्षणे दिसतात, वेळीच घ्या काळजी नाहीतर...

SCROLL FOR NEXT