मुंबई-पुणे एक्स्प्रेस वेवर भीषण अपघात; अमृतांजन पुलाच्या खांबाला धडकून ट्रकचा चक्काचूर, केबिनमध्ये अडकला ड्रायव्हरचा मृतदेह

Mumbai - Pune Express Way Accident Update : मुंबई-पुणे महामार्गावर उतारावर भरधाव ट्रकवरील चालकाचा ताबा सुटला. तो ट्रक थेट अमृतांजन पुलाच्या खांबाला धडकला. या भीषण अपघातात चालकाचा जागीच मृत्यू झाला.
मुंबई-पुणे महामार्गावर अमृतांजन पुलाच्या सिमेंटच्या खांबाला भरधाव ट्रक धडकला. या भीषण अपघातात चालकाचा जागीच मृत्यू झाला.
मुंबई-पुणे महामार्गावर अमृतांजन पुलाच्या सिमेंटच्या खांबाला भरधाव ट्रक धडकला. या भीषण अपघातात चालकाचा जागीच मृत्यू झाला. Saam TV
Published On

दिलीप कांबळे, मावळ, पुणे

मुंबई-पुणे एक्स्प्रेस वेवर भीषण अपघात झाला. पुण्याहुन मुंबईच्या दिशेने सिमेंटचे ब्लॉक घेऊन जाणाऱ्या भरधाव ट्रकवरील ताबा सुटून तो अमृतांजन पुलाच्या सिमेंटच्या खांबाला धडकला. ही धडक इतकी जोरदार होती की ट्रक अक्षरशः चक्काचूर झाला. या भयंकर अपघातात चालकाचा मृत्यू झाला.

ट्रक पुण्याहून मुंबईच्या दिशेने निघाला होता. या ट्रकमध्ये सिमेंटचे ब्लॉक होते. मुंबई-पुणे एक्स्प्रेसवर ट्रक भरधाव वेगाने जात होता. चालकाचा ट्रकवरील ताबा सुटला. हा ट्रक उतारावर अमृतांजन पुलाच्या सिमेंटच्या भल्या मोठ्या खांबाला धडकला. यात ट्रकचा चक्काचूर झाला आहे. तर ट्रक चालकाचा जागीच मृत्यू झाला.

महामार्ग पोलीस तसेच देवदूत यंत्रणेतील कर्मचारी घटनास्थळावर पोहोचले. अपघातग्रस्त ट्रकच्या केबिनमध्ये चालकाचा मृतदेह अडकला होता. तो बाहेर काढला. सरकारी रुग्णालयात मृतदेह विच्छेदनासाठी पाठवण्यात आला आहे. अपघातामुळे पुण्याहून मुंबईकडे जाणारी एक मार्गिका बंद केली होती. त्यामुळं महामार्गावर काही वेळ वाहतूक कोंडी झाली होती. अवजड क्रेनच्या मदतीने अपघातग्रस्त ट्रक महामार्गाच्या बाजूला करण्याचे काम हाती घेण्यात आले. या अपघाताचा तपास लोणावळा महामार्ग पोलीस करत आहेत.

धुळ्यात बर्निंग कारचा थरार, चालकाचा होरपळून मृत्यू

भूषण अहिरे, धुळे | साम टीव्ही

धुळे जिल्ह्यातील शिरपूर तालुक्यात असलेल्या खामखेडा गावाजवळ कार जळून खाक झाली. यात कारमधील चालकाचा देखील होरपळून मृत्यू झाला. ही घटना कशामुळे घडली याबाबत अद्याप पोलिसांकडून कुठलीही माहिती देण्यात आली नाही.

खामखेडा गावाजवळील रस्त्याच्या बाजूला ही कार जळालेल्या अवस्थेत आढळून आली. मिळालेल्या माहितीनुसार, पहाटेच्या सुमारास ही घटना घडली. चंद्रकांत धिवरे यांच्या मालकीची ही कार आहे. ते सूरत येथे वास्तव्यास होते. ते खामखेडा येथे त्यांच्या मूळ गावी कारने येत होते. गावाजवळ आले असता, कारने पेट घेतला. यात धिवरेंचा होरपळून मृत्यू झाला, अशी प्राथमिक माहिती देण्यात आली. ही आग लागली की लावण्यात आली, याचा तपास पोलिसांकडून सुरू आहे.

मुंबई-पुणे महामार्गावर अमृतांजन पुलाच्या सिमेंटच्या खांबाला भरधाव ट्रक धडकला. या भीषण अपघातात चालकाचा जागीच मृत्यू झाला.
Accident: भीषण अपघात! ११ वाहनं धडाधड धडकली, नंतर पेटली; १३ प्रवासी जिवंत होरपळले, प्रत्यक्षदर्शींनी सांगितला थरार

हिंगोलीत भीषण अपघात, चालकाच्या डुलकीनं केला घात

संदीप नागरे, हिंगोली

अकोला: हैदराबाद राष्ट्रीय महामार्गावर कारचा भीषण अपघात झाला. हिंगोली-कळमनुरी दरम्यान असलेल्या उमरा गावाच्या जवळ कार डिव्हायडरला धडकली. यात चालकासह अन्य प्रवासी जखमी झाल्याची माहिती आहे. राष्ट्रीय महामार्ग पोलिसांनी तातडीने जखमींना हिंगोलीच्या शासकीय रुग्णालयात उपचारासाठी दाखल केले. चालकाला डुलकी लागल्याने हा अपघात झाल्याची माहिती समजते.

मुंबई-पुणे महामार्गावर अमृतांजन पुलाच्या सिमेंटच्या खांबाला भरधाव ट्रक धडकला. या भीषण अपघातात चालकाचा जागीच मृत्यू झाला.
Expressway Accident : मुंबई एक्सप्रेसवेवर भयानक अपघात, भल्या पहाटे पिकअपचा कोळसा, ३ जण जिवंत जळाले

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com