Aditya Thackeray and Amit Thackeray addressing BMC election candidates while presenting their development roadmap for Mumbai. Saam Tv
Video

मुंबईकरांसाठी हक्काचं घर, मोफत बससेवा अन् 100 युनिटपर्यंत वीज, ठाकरेंचं आश्वासन|VIDEO

Thackeray Brothers Promises For Mumbai Civic Elections: मुंबई महापालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर ठाकरे बंधूंची मोठी घोषणा. पुढील पाच वर्षांत एक लाख परवडणारी घरे, महिलांसाठी मोफत बससेवा आणि 100 युनिटपर्यंत मोफत वीज देण्याचे आश्वासन.

Omkar Sonawane

महानगरपालिका निवडणुकीसाठी ठाकरे बंधू एकत्र आले असताना आता त्यांची पुढची पिढीदेखील मैदानात उतरलीय. अमित आणि आदित्य ठाकरेंनी महापालिका उमेदवारांचे मार्गदर्शन केलं. तसेच मुंबईकरांना आपण हक्काचे घर देणार असून पुढच्या 5 वर्षात 1 लाख घरे देणार असल्याचे आदित्य ठाकरे यांनी मुंबई महापालिका निवडणूक लढवणाऱ्या उमेदवारांना मार्गदर्शन करताना यावेळी म्हटलं. आमदार आदित्य ठाकरे आणि मनसे प्रमुख राज ठाकरे यांचे चिरंजीव यांनी प्रेझेटेशनमध्ये दिलेले आश्वासन

महापालिकेच्या मालकीच्या जमिनी खासगी बिल्डरांच्या घशात न घालता त्याठिकाणी मुंबईकरांची सेवा करणाऱ्या शासकीय, महापालिका, बेस्ट आणि पोलीस कर्मचाऱ्यांना तसेच गिरणी कामगारांना हक्कांची घरे देणार तसेच मुंबई महापालिकेचे स्वतःचे गृहनिर्माण प्राधिकरण असेल. पुढच्या 5 वर्षात 1 लाख मुंबईकरांना परवडणारी हक्कांची घरे दिली जातील.

परिवहन- सामान्य माणसाच्या खिशाला परवडणारा बेस्ट प्रवास

तिकीट दरवाढ कमी करून 5-10-15-20 असे दर ठेवणार

बेस्टच्या ताफ्यात 10 हजार इलेक्ट्रिक बसेस आणणार

900 डबल डेकर इलेक्ट्रिक बस

जुने मार्ग पुन्हा सुरू करणार

महिला आणि विशेष बेस्ट बसमध्ये मोफत प्रवास

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Chanakya Niti: चाणक्यांचा सल्ला! शांत राहणाऱ्या लोकांपासून वेळीच व्हा सावध; नाहीतर...

Raigad Tourism : पांढरी वाळू अन् निळेशार पाणी; रायगडमधील मनमोहक किनारा, परफेक्ट लोकेशन काय?

Maharashtra Live News Update: अहिल्यानगर महापालिकेत ६ फेब्रुवारीला होणार महापौर-उपमहापौर पदाची निवड

Jhumka Latest Designs: तरुणी पडल्या 'या' झुमक्याच्या प्रेमात, 'हे' आहेत लेटेस्ट पॅटर्न्स

Prathamesh Kadam: आत्महत्या की डेंग्यू...; मैत्रिणीने सांगितलं मराठी रिलस्टार प्रथमेशच्या मृत्यूचं खरं कारण

SCROLL FOR NEXT