Devendra Fadnavis on mahayuti in BMC elections saam tv
Video

ठाकरे बंधू एकत्र आल्याचा धसका, CM फडणवीसांनी सांगितला निवडणूक प्लान | VIDEO

Devendra Fadnavis on BMC election Plan : मुंबई महापालिकेची निवडणूक ही महायुती म्हणूनच लढवण्यात येणार असल्याचं भाजप नेते आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सांगितले.

Nandkumar Joshi

Maharashtra Elections : मुंबईत ठाकरे बंधू एकत्र आल्याने महायुतीनं धसका घेतल्याचं चित्र दिसून येत आहे. त्यामुळं सुरुवातीला स्वतंत्र लढण्याची भाषा करणाऱ्या भाजपनं मुंबईत महायुती म्हणून लढणार असल्याचं स्पष्ट केलं आहे. दोन्ही ठाकरेंची युती झाली तरी, मुंबईत महायुतीचाच महापौर होणार असल्याचा विश्वास मुख्यमंत्र्यांनी व्यक्त केला.

काय म्हणाले मुख्यमंत्री?

कोण कोणासोबत युती करतंय हे गौण आहे. मुंबईच्या जनतेने महायुतीचा महापौर करायचा ठरवलं आहे. त्यामुळे आम्हाला कोणासोबत लढायचं हे पुढच्या काळात स्पष्ट होईल. ते एकत्रित आले, वेगळे लढले, कसंही झालं तरीही महापौर हा महायुतीचाच होईल, असंही देवेंद्र फडणवीस म्हणाले.

आपण ही निवडणूक महायुती म्हणून लढत आहोत. पण स्थानिक स्तरावर काही निर्णय घेण्याचे अधिकार आमच्याकडून देण्यात येतील. ज्या ठिकाणी काही अडचणी आहेत, त्यांनी आमच्याशी चर्चा करायची आहे आणि निर्णय घ्यायचे आहेत. पण शक्यतो निवडणुका महायुतीत लढायच्या. जेथे महायुतीत लढणे शक्य होणार नाही, त्या ठिकाणी आपल्या मित्रपक्षावर कुठलीही टीका करायची नाही, अशा सूचनाच फडणवीसांनी नेते, पदाधिकाऱ्यांना दिल्या.

नेते, पदाधिकाऱ्यांना इशारा आणि संजय राऊतांना टोला

कुणी जर पक्षाला खड्ड्यात घालण्याचा प्रयत्न करत असेल तर त्याला खड्ड्यात घालण्याचं काम पक्ष करेल एवढं लक्षात ठेवावं, असा अप्रत्यक्ष इशारा देवेंद्र फडणवीस यांनी पक्षाचे कार्यकर्ते, पदाधिकारी आणि नेत्यांना दिला. दुसरीकडं, खड्ड्यात घालणं म्हणजे खरोखर नाही. नाही तर म्हणाल मुख्यमंत्री धमक्या द्यायला लागले. मग पुन्हा सकाळचा भोंगा वाजू लागेल, असा टोला त्यांनी संजय राऊतांचं नाव न घेता लगावला.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

HBD Sanjay Dutt : बॉलिवूडचा मुन्नाभाई किती कोटींचा मालक?

Dharashiv Crime : बँकेची लोखंडी खिडकी तोडून चोरट्यांचा आत प्रवेश; दरोड्याचा प्रयत्न फसला

Sangali Nag Panchami : सांगलीकरांची २३ वर्षांची प्रतीक्षा संपली, जिवंत नाग पकडण्याला परवानगी, नेमकं प्रकरण काय?

Honey Trap : नाशिकनंतर सांगलीतही हनी ट्रॅप, २ माजी मंत्र्यांचा सहभाग, खडसेंचा खळबळजनक दावा

Maharashtra Live News Update : माणिकराव कोकाटे अजित पवारांच्या भेटीसाठी रवाना, राजीनामा देणार का?

SCROLL FOR NEXT