Eknath Shinde Complains to Amit Shah About BJP Leaders saamtv
Video

'पैसे देऊन आमचे नेते फोडले', भाजप नेत्यावर शिंदेंचा आरोप; अमित शहांसोबतच्या बैठकीत नेमकं काय घडलं?

Eknath Shinde Complains to Amit Shah About BJP Leaders: उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांची भेट घेतली. तब्बल ५० मिनिटे ही बैठक सुरू होती. कल्याण डोंबिवलीतील ऑपरेशन लोटसबाबत त्यांनी नाराजी व्यक्त केली.

Bhagyashree Kamble

  • दिल्लीत शहा-शिंदे खलबतं

  • भाजप नेत्यावर नगरसेवक फोडल्याचा गंभीर आरोप

  • ५० मिनिटांच्या बैठकीत नेमकं काय घडलं?

ऐन स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची दिल्लीवारी वाढली आहे. दिल्लीत केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांची उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी भेट घेतली. ही बैठक तब्बल ५० मिनिटे सुरू होती. या बैठकीत उपमुख्यमंत्री शिंदेंनी राज्यातील भाजपच्या वरिष्ठ नेत्यांबद्दल तक्रार केल्याची माहिती आहे.

खासदार श्रीकांत शिंदे यांच्या लोकसभा मतदारसंघात भाजपने शिवसेना नेत्यांना प्रवेश दिल्याने एकनाथ शिंदेंनी तीव्र नाराजी व्यक्त केली. याशिवाय, महाविकास आघाडीतील पराभूत उमेदवारांना भाजपात प्रवेश देऊन त्यांना ताकद दिली जात असल्याचाही आरोप करण्यात आला. शिंदे गटानुसार, 'रवींद्र चव्हाण पैसे देऊन मित्र पक्षांचे नगरसेवक फोडत आहेत', असा थेट आरोप करण्यात आला आहे. या बैठकीतील मुद्द्यांमुळे राज्यातील शिंदे गट आणि भाजप यांच्यातील संबंधांवर चर्चा सुरू झाली आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra News Live Update: मुख्यमंत्री फडणवीस स्वतः दुष्काळ भागाची पाहणी करणार

Rajya Sabha : मोठी बातमी! राज्यसभेच्या १२ जागांसाठी निवडणुकीची घोषणा, कधी होणार मतदान? वाचा सविस्तर

शेंगदाणे सालीसकट खावेत की साल काढून? जाणून घ्या आरोग्यासाठी कोणते आहे अधिक फायदेशीर

Satara Earthquake: साताऱ्याच्या कोयना धरण परिसरात भूकंपाचा धक्का, घाबरून नागरिक घराबाहेर पळाले

Heart blockage percentage: रिपोर्टमध्ये 70-80% ब्लॉकेज दिसले म्हणजे हार्ट अटॅक येणार? हृदयात किती टक्के ब्लॉकेज धोकादायक?

SCROLL FOR NEXT