Torres Scam SaamTv
Video

Torres Scam : 2025 चा सर्वात मोठा घोटाळा; टोरेसचा ग्राहकांना ५०० कोटींचा गंडा | Video

Torres Rs 500 Crore Fraud : टोरेस नामक कंपनीकडून हजारो नागरिकांची कोट्यावधी रुपयांची फसवणूक केली आहे. त्यामुळे फसवणूक झाल्याचं कळताच नागरिकांनी कंपनीच्या कार्यालयांबाहेर एकच गर्दी केली आहे.

Saam Tv

टोरेस नामक कंपनीकडून हजारो नागरिकांची फसवणूक झाली असल्याचं समोर आले आहे. मुंबईतील दादर, नवी मुंबईतील तुर्भे आणि मिरारोड शाखा सोमवारी बंद करून पळ काढल आहे. गुंतवणूक दार सोमवारी टोरेसच्या कार्यालयात आले असता टाळे लागल्याने आपली फसवणून झाल्याच समोर आले आहे. टोरेस कंपनी भाईंदर पूर्वच्या रामदेव पार्क परिसरात स्थित आहे आणि त्याच्या माध्यमातून अनेक ग्राहकांना आकर्षित केले गेले. कंपनीने गुंतवणूकदारांना अधिक व्याजाचे आमिष दाखवून त्यांची जमापूंजी हलवली. जवळपास ५०० कोटींचा चुना या कंपनीने ग्राहकांना लावला असल्याचं सांगितलं जात आहे. त्यामुळे आता आपल्या पैशांसाठी गुंतवणूकदारांनी कंपनी बाहेर एकच गर्दी केलेली बघायला मिळत आहे.

भाईदर पूर्वच्या रामदेव पार्क परिसरात असणाऱ्या आर्टिफिशल डायमंड विक्री करणाऱ्या टोरेस नामक कंपनीच्या मार्फत लोकांना पैसे गुंतवणूक करण्यास सांगत वर्षभर त्यांना त्यावर प्रत्येक आठवड्याला काही टक्केवारी प्रमाणे रक्कम खात्यात जमा होईल असे सांगण्यात आले होते. मात्र अचानक सोमवारी सकाळी या शोरूमचे दादर येथील मुख्य कार्यालय बंद झाले व त्यांच्या सोबत मिरा भाईदरमधील देखील शोरूम बंद करण्यात आले. शोरूम बंद झाल्याची माहिती मिळताच पैसे गुंतवणूक केलेल्या लोकांची गर्दी जमा झाली व त्यांचे पैसे डुबल्याचे व त्यांच्या सोबत फसवणूक झाल्याचे समजताच लोकांनी राग व्यक्त करण्यास सुरवात केली आहे. यात साधारण ५०० कोटींचा घोटाळा झाला असल्याचा अंदाज आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

NASA Warning: पृथ्वीवर आदळणार महाकाय लघुग्रह? नासाचा मोठा इशारा

Marathi bhasha Vijay Live Updates : ठाकरेंच्या मेळाव्यासाठी मराठी कलाकारांची फौज, कोण कोण आले?

Maharashtra Live News Update: कुकडी प्रकल्पातील डिंभे धरण ५० टक्के भरले

Hockey Asia Cup: पाकिस्तान खेळणार 'आशिया कप', हॉकी संघ भारतात येणार: क्रीडा मंत्रालयाचा हिरवा कंदील

Underi : उंदेरी किल्ला कधी पाहिला का? पावसाळ्यात ट्रिप प्लान कराच

SCROLL FOR NEXT