devendra fadanvis exposed scam of tanaji sawant  Saam Tv
Video

Maharashtra Politics: शिंदेंच्या माजी मंत्र्याला दणका, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांकडून कोट्यवधींच्या टेंडरला स्थगिती

Tanaji Sawant: माजी मंत्री तानाजी सावंत यांच्या अडचणी वाढण्याची शक्यता आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सावंत यांनी एका कंपनीला 3 हजार 190 कोटी रुपयांचे टेंडरला स्थगिती दिली आहे.

Saam Tv

माजी आरोग्यमंत्री तथा शिंदेसेनेचे आमदार तानाजी सावंत यांनी यांत्रिकी साफसफाईच्या कामात कोट्यवधींचा घोटाळा केल्याचे उघडकीस आले आहे. राज्यातील सर्व सरकारी रुग्णालये आणि आरोग्य केंद्रात यांत्रिकी पद्धतीने सफसफाई करण्यासाठी आधी 70 कोटी रुपयांमध्ये व्हायची, त्याच कामांसाठी तानाजी सावंत यांनी 3 हजार 190 कोटी रुपये आपल्या एका मर्जीतल्या कंपनीला दिल्याचे उघडकीस आले आहे. त्यामुळे तानाजी सावंत यांच्या अडचणी वाढल्या आहेत.

दरम्यान हे सगळे प्रकरण समोर येताच मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी तात्काळ या टेंडरला स्थगिती दिली आहे. यावरच ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी फडणवीसांचे कौतुक केले आहे. संजय राऊत म्हणाले, आरोग्य खात्याचा थेट संबंध हा जनतेशी येतो. औषधामध्ये आणि खरेदीमध्ये तर हे कसले राज्य आहे.जर राज्याचे मुख्यमंत्री हे सगळे थांबवत असेल आणि झालेला भ्रष्टाचार लोकांसमोर मांडणार असेल तर आम्ही त्यांच्या प्रत्येक कृतीचे स्वागतच करू असे कौतुगोद्गार संजय राऊत यांनी फडणवीस यांच्या प्रती काढले.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Vice President Election: सी.पी. राधाकृष्णन कोण आहेत? जाणून घ्या राधाकृष्णन यांचा राजकीय प्रवास

Amol Kolhe :...म्हणून लोकांच्या मनात संभ्रम निर्माण होतोय; खासदार अमोल कोल्हेंचा भाजपवर जोरदार प्रहार

Jalna Accident: ट्रकच्या धडकेत रिक्षाचा चक्काचूर; भीषण अपघातात ३ जणांचा जागीच मृत्यू

Voter Fraud : खोपोलीतही मतदार याद्यांमध्ये घोळ, 140 मतदारांची नावं यादीत दोन वेळा

Makeup Side Effects: दररोज मेकअप केल्याने चेहऱ्यावर काय परिणाम होतो?

SCROLL FOR NEXT