Police investigate the suspicious death of a British broadcast engineer at a Mumbai hotel during IPL coverage. Saam Tv
Video

मुंबईत BCCIच्या ब्रॉडकास्ट इंजिनिअरचा संशयास्पद मृत्यू; IPLसाठी आला होता भारतात|VIDEO

British Broadcast Engineer Found Dead In Mumbai Hotel: मुंबईत आयपीएल कव्हर करण्यासाठी आलेल्या BCCIच्या ब्रॉडकास्ट टीममधील ब्रिटिश इंजिनिअरचा संशयास्पद मृत्यू झाला आहे.

Omkar Sonawane

मुंबईत BCCIच्या ब्रॉडकास्ट टीममधील एका परदेशी इंजिनिअरचा संशयास्पद मृत्यू झाल्याची घटना समोर आली आहे. विल्यम्स लेग्नफोर्ड असे मृत व्यक्तीचे नाव असून ते मूळचे ब्रिटिश नागरिक होते. मिळालेल्या माहितीनुसार विल्यम्स लेग्नफोर्ड हे आयपीएल (IPL) सामने कव्हर करण्यासाठी भारतात आले होते. ते 24 मार्चपासून Trident Hotel येथे काही दिवसांसाठी राहत होते.

दरम्यान, त्यांचा मृतदेह आढळून आल्यानंतर परिसरात खळबळ उडाली आहे. या प्रकरणाची नोंद मरीन ड्राइव्ह पोलीस स्टेशन येथे करण्यात आली असून पोलिसांनी तपास सुरू केला आहे. सध्या मृत्यूचे नेमके कारण अद्याप स्पष्ट झालेले नाही. वैद्यकीय अहवाल आल्यानंतरच अधिक माहिती समोर येणार असल्याचे पोलिसांनी सांगितले आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Today's Horoscope : 'विठूमाऊलीची' अथांग कृपा! आज ६ राशींचे नशीब उजळणार; होणार धनलाभ, तुमच्या भाग्यात आज काय?

मुंबईतील डेअरिंगबाज तरुण आंदोलक, बेधडक GEN Z ; आंदोलनात डिजिटल पिढीचा स्वॅग

पोलिसांनी आंदोलक विद्यार्थ्यांना धमकावलं; विद्यार्थ्यांच्या खिशात ड्रग्ज ठेवण्याची धमकी

Friday Horoscope: या राशींना आरोग्याकडे दुर्लक्ष करणं पडेल महागात; वाचा आजचं राशीभविष्य

Sonam Wangchuk Ends Hunger Strike: सोनम वांगचुक यांचे २६ दिवसांनंतर उपोषण मागे, सरकारकडून काय आश्वासन मिळालं?

SCROLL FOR NEXT