Bomb Disposal Squad arrives at Gundawali Metro Station after a black unattended bag sparks panic in Andheri, Mumbai. Saam Tv
Video

CSMT नंतर आता अंधेरीत मेट्रो स्टेशनवर सापडली संशयास्पद बॅग; प्रवाशांची वाढली धाकधूक

Suspicious Bag Found Andheri Metro Station: अंधेरीतील गुंदावली मेट्रो स्टेशनवर सापडलेल्या काळ्या बेवारस बॅगमुळे मुंबईत सुरक्षा यंत्रणा सतर्क झाली आहे. बीडीडीएस पथकाच्या तपासणीनंतर बॅगमध्ये काय आहे हे स्पष्ट होणार आहे.

Omkar Sonawane

दिल्लीतील बॉम्बस्फोटाच्या घटनेनंतर मुंबईत सुरक्षा यंत्रणा सतर्क झाली आहे. आज दुपारी २ वाजण्याच्या सुमारास अंधेरीतील गुंदावली मेट्रो स्टेशनच्या पहिल्या मजल्यावर एक काळी बेवारस बॅग आढळल्याने खळबळ उडाली आहे. या बॅगमध्ये घातपाताचे साधन असल्याचा संशय व्यक्त केला जात आहे. अंधेरी पोलिसांनी तत्काळ Bomb Detection and Disposal Squad (BDDS) पथकाला घटनास्थळी पाचारण केले आहे. BDDS टीमच्या तपासणीनंतर बॅगमध्ये नेमके काय आहे हे स्पष्ट होईल.

प्रवाशांमध्ये यामुळे भीतीचं वातावरण निर्माण झालं आहे. यापूर्वी कालही सीएसएमटी रेल्वे स्थानकात अशीच बेवारस बॅग आढळून सुरक्षा यंत्रणांना सर्तक करण्यात आले होते. सलग दोन दिवसांत शहरातील गर्दीच्या स्थानकांवर बेवारस बॅगा आढळणे हा गंभीर इशारा असल्याचे अधिकारी सांगत आहेत.

मुंबई पोलिस आणि BDDS पथकाने सर्व सुरक्षा नियमांचे पालन करत चौकशी सुरू केली असून, नागरिकांना सावध राहण्याचे आवाहन करण्यात आले असून असा कुठलाही संशय आला तर तत्काळ पोलिसांना कळवा असे आवाहन प्रशासनाकडून करण्यात आला आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Deepika Padukone : चाहत्याच्या आईने पुरणपोळी आणली अन् दीपिकाने थेट...; VIDEO मधील साधेपणा पाहून नेटकरी भारावले

Maharashtra Live News Update: आज पुण्यात अजित पवारांचा रोड शो

Nashik Politics: मोठी बातमी! नाशिकमध्ये भाजपला मोठं खिंडार, एकनाथ शिंदेंनी ३ बडे नेते फोडले

Government Job: सरकारी कंपनीत नोकरीची सुवर्णसंधी; मिळणार लाखो रुपये पगार; पात्रता काय? वाचा सविस्तर

Gold Rate Today: सोन्याची किंमतीत वाढ की घसरण? वाचा २२ आणि २४ कॅरेटचा आजचा दर

SCROLL FOR NEXT