Police cordon off Vile Parle station area as the Bomb Detection Squad examines a suspicious abandoned bag. Saam Tv
Video

मुंबईत खळबळ! विलेपार्ले येथे बेवारस बॅग; वाहतूक आणि प्रवासी हालचाल बंद|VIDEO

Mumbai Alert: विलेपार्ले पूर्व रेल्वे स्टेशनजवळ सापडलेल्या संशयित बॅगमुळे परिसरात घबराट पसरली होती. पोलीस आणि बॉम्ब शोधक पथकाने तपास केल्यानंतर बॅगमध्ये फक्त कपडे असल्याचे स्पष्ट झाले.

Omkar Sonawane

मुंबईच्या विलेपार्ले पूर्व परिसरात एक बेवारस संशयित बॅग आढळल्याने नागरिकांमध्ये एकच खळबळ उडाली आहे. ही बॅग विलेपार्ले पूर्व रेल्वे स्टेशन परिसरात आढळताच तात्काळ पोलिसांना माहिती देण्यात आली.

घटनास्थळी पोहोचलेल्या पोलिसांनी परिसर बंद करत वाहतूक तसेच प्रवासी हालचाल तात्पुरती थांबवली आहे. सुरक्षा लक्षात घेऊन संपूर्ण परिसर कॉर्डन करण्यात आला असून स्टेशनवरील प्रवाशांना सुरक्षित स्थळी हलविण्यात आले आहे.

दरम्यान, बॉम्ब शोधक पथक (BDDS) घटनास्थळी दाखल झाले असून संशयित बॅगेची तपासणी सुरू आहे. बॅगेत काय आहे याची अधिकृत माहिती अद्याप समोर आलेली नाही. काही दिवसांपूर्वीच एनआयएने देशातील प्रमुख शहरातून व्हाईट कॉलर दहशतवाद्यांना अटक केली होती. तसेच दिल्ली येथील लाल किल्ल्याजवळ झालेल्या बॉम्बस्फोटामुळे यंत्रणा अधिक सतर्क झाली आहे.

विलेपार्ले येथील तपासात बॅगेत फक्त कपडे आणि चपला आढळल्याने अफवा खोटी ठरली. या घटनेमुळे प्रवासी आणि नागरिकांमध्ये निर्माण झालेली दहशत वाढली होती. अखेर पोलिसांनी वाहतूक पूर्ववत सुरू केली असून नागरिकांनी सुटकेचा निश्वास घेतला.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Krantijyoti Vidyalay: 'क्रांतिज्योती विद्यालय – मराठी माध्यम'चा बॉक्स ऑफिसवर धुमाकूळ; सहा दिवसात गाठला ५ कोटींच्या टप्पा

Imtiyaz Jaleel Attack: माजी खासदार इम्तियाज जलील यांच्यावर हल्ला का झाला? रॅलीत नेमकं काय घडलं? Video

अंबरनाथमध्ये मोठी राजकीय घडामोड; काँग्रेसचे निलंबित १२ नगरसेवक भाजपमध्ये प्रवेश करणार?

Period pain relief: दर महिन्याला पेनकिलर घेणं पडू शकतं महागात; Period Pain पासून त्वरित आराम देतील हे ५ घरगुती उपाय

महाराष्ट्रातलं Switzerland! थंडीत नक्की भेट द्या मुंबई-पुण्याजवळच्या 'या' मिनी स्वित्झर्लंडला

SCROLL FOR NEXT