Chhatrapati Sambhajinagar And Dharashiv Renaming Plea Saam Tv
Video

VIDEO: छत्रपती संभाजीनगर आणि धाराशिव नावं कायम राहणार? पाहा, सुप्रीम कोर्ट काय म्हणालं

Chhatrapati Sambhajinagar And Dharashiv Renaming Plea: छत्रपती संभाजीनगर आणि धाराशिव नामांतरप्रकरणी मोठी अपडेट समोर आली आहे. यासंदर्भातील याचिका सर्वोच्च न्यायालयाने फेटाळली आहे.

Rohini Gudaghe

मुंबई: छत्रपती संभाजीनगर आणि धाराशिव नामांतरप्रकरणी आज २ ऑगस्ट रोजी सुप्रीम कोर्टात सुनावणी झाली. यावेळी कोर्टाने संभाजीनगर आणि धाराशिव नामांतर प्रकरणी याचिका फेटाळली आहे. संभाजीनगर आणि धाराशिव नामांतरप्रकरणी हस्तक्षेप करण्यास सर्वोच्च न्यायालयाने नकार दिलाय. नाव देण्याचा आणि बदलण्याचा अधिकार कायद्याने दिलेला असल्याचं सर्वोच्च न्यायालयानं निरीक्षण नोंदवलं आहे. शहराचे नाव बदलल्यानंतर काही लोक समर्थनार्थ आणि विरोधात असणार आहेत, असं महत्त्वपूर्ण निरीक्षण न्यायालयाने नोंदवलं आहे.

छत्रपती संभाजीनगर आणि धाराशिव नामांतर हे अलाहाबाद आणि औरंगाबाद प्रकरणासारखं नसल्याचं सर्वोच्च न्यायालयाने म्हटलं आहे. मुंबई उच्च न्यायालयाच्या निर्णयाविरोधात याचिकाकर्त्यांने सुप्रीम कोर्टात अपिल केलं होतं. हा निर्णय केवळ राजकीय हेतू ठेवूनच घेण्यात आल्याचं याचिकाकर्त्यांचं मत होतं. राज्य सरकारकडून निजामांचा इतिहास पुसून टाकण्याचा प्रयत्न केला जात असल्याचा मुद्दा याचिकेत मांडण्यात आला होता. परंतु सर्वोच्च न्यायालयाने ही याचिका फेटाळली आहे.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Kolhapur Politics: मधुरिमाराजेंच्या माघारीची INSIDE STORY; कोल्हापूर उत्तर मतदारसंघात काय घडलं?

Assembly Election: एकनाथ शिंदे आणि राज ठाकरेंमध्ये संघर्ष; शिंदेविरुद्ध दोन ठाकरे

Maharashtra Election: महायुतीनं केलंय काम भारी! लाडक्या बहिणींना मिळणार २१०० रुपये, कोल्हापुरात महायुतीची १० वचनं

Maharashtra News Live Updates: भाजपचा मनसेचे उमेदवार बाळा नांदगावकर यांना पाठिंबा

Uddhav Thackeray: पीएम मोदींच्या अशुभ हातांनी बांधलेला पुतळा पडला'; उद्धव ठाकरेंची टीका

SCROLL FOR NEXT