Sunetra Pawar during a key political meeting ahead of her swearing-in as Maharashtra’s Deputy Chief Minister. Saam Tv
Video

ठरलं! सुनेत्रा अजित पवार उपमुख्यमंत्री होणार; शपथविधीसाठी मुंबईला रवाना, VIDEO

Maharashtra New Deputy Chief Minister Oath Ceremony Time: महाराष्ट्राच्या राजकारणात ऐतिहासिक घडामोड! सुनेत्रा अजित पवार उद्या संध्याकाळी 5 वाजता उपमुख्यमंत्रिपदाची शपथ घेणार असून महाराष्ट्राला पहिली महिला उपमुख्यमंत्री मिळणार आहे.

Omkar Sonawane

राजकीय वर्तुळातून सर्वात मोठी बातमी समोर आली आहे. उद्या संध्याकाळी 5 वाजता सुनेत्रा अजित पवार ह्या उपमुख्यमंत्रिपदाची शपथ घेणार आहे. आज सकाळपासूनच राजकीय घडामोडींना वेग आला होता. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या वर्षा निवासस्थानी राष्ट्रवादीच्या काही प्रमुख नेत्यांची फडणवीस यांच्यासोबत बैठक पार पडली. यामध्ये सुनेत्रा पवार यांच्या नावावर एक मत झाल्याचे सांगितले जात आहे. उद्या सकाळी 11 वाजता राष्ट्रवादीच्या सर्व आमदारांची मुंबईमध्ये बैठक पार पडणार आहे. त्यानंतर सुनेत्रा पवार या उपमुख्यमंत्रिपदाची शपथ घेणार आहेत. अजित पवार यांचे राजकीय सल्लागार नरेश अरोरा यांनी या संदर्भात सुनेत्रा पवार यांच्यासोबत चर्चा केली असून सुनेत्रा पवार यांनी उपमुख्यमंत्रिपदासाठी होकार दिल्याचे सांगितले जात आहे. त्या आता उद्या संध्याकाळी शपथ घेणार असून महाराष्ट्राला पहिल्या महिला उपमुख्यमंत्री मिळणार आहे. या शपथविधीसाठी मुंबईला रवाना झाल्या आहेत.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

'मशाली'वर निवडून आले, पण आदेश मोडले; बेपत्ता ४ नगरसेवकांवर ठाकरेंचा निलंबनाचा इशारा

महाराष्ट्राचा अर्थसंकल्प कोण सादर करणार? CM देवेंद्र फडणवीसांनी स्पष्टच सांगितलं

Saturday Horoscope : आयुष्यात मोठं काही तर घडणार; ५ राशींच्या लोकांनी घराबाहेरच्या व्यक्तीचा सल्ला घेऊ नये, अन्यथा...

अमेरिकेचा इराणवरील हल्ल्याचा सिक्रेट प्लॅन? अमेरिका-इराणमध्ये महायुद्ध पेटणार?

काँग्रेस-MIMच्या नगरसेवकांमध्ये राडा, अकोल्यात भाजपचाच महापौर

SCROLL FOR NEXT